"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:34 IST2025-04-11T18:32:36+5:302025-04-11T18:34:14+5:30
देवोलिनाने २०२४च्या डिसेंबर महिन्यात गोंडस लेकाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवोलिनाने तिच्या चिमुकल्यावर भाष्य केलं.

"तुमचा मुलगा अब्दुल होणार की राम?", लेकाबद्दल प्रश्न विचारताच आंतरधर्मीय विवाह केलेल्या देवोलिनाचं स्पष्ट उत्तर, म्हणाली...
'साथ निभाना साथिया' मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी घराघरात पोहोचली. देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं. आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. लग्नानंतर २ वर्षांनी गोपी बहूच्या घरी पाळणा हलला. देवोलिनाने २०२४च्या डिसेंबर महिन्यात गोंडस लेकाला जन्म दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवोलिनाने तिच्या चिमुकल्यावर भाष्य केलं.
देवोलिनाने नुकतीच पारस छाबराच्या पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत तिला पारसने "तुमचा मुलगा अब्दुल बनेल की राम?" असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं देवोलिनाने स्पष्ट शब्दांतच उत्तर दिलं. ती म्हणाली, "माझा मुलगा भारतीय बनेल. प्रत्येकाला स्वत:बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. माझ्या मुलाच्या बाबतीत मला वाटतं की मी माझा धर्म त्याच्यावर का लादू? किंवा शाहनने(शाहनवाज देवोलिनाचा पती) त्याचा धर्म त्याच्यावर का लादावा?".
"जेव्हा त्याला समजायला लागेल...तेव्हा दोन्ही धर्माच्या संस्कृती त्याने पाहिलेल्या असतील. मी देवाची पूजा करते हे पण तो बघेल. आणि शाहन नमाज पढतो, मस्जिदमध्ये जातो हेदेखील तो बघेल. देव एकच आहे असं मी मानते. एनर्जी एकच आहे. फक्त नावं वेगळी आहेत. मग राम, अल्लाह कोणीही असो...सगळे एकच आहे. फक्त त्याने चांगला मनुष्य व्हावं", असंही तिने पुढे सांगितलं.