Bigg Boss 15 : अरे देवा! देवोलिनाचा सुटला कंट्रोल, तरीही 15 तास पोलवर उभी राहून पूर्ण केला टास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:13 PM2022-01-05T14:13:37+5:302022-01-05T14:14:35+5:30

Bigg Boss 15 : नुकताच रश्मी देसाई (Rashami Desai)  व देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) या दोघींमध्ये  ‘टिकिट टू फिनाले’ टास्क रंगला. टास्क तसा सोपा. पण तो जसा जसा  पुढे गेला, तसा तसा कठीण बनंत गेला.

Devoleena Bhattacharjee Peed In Her Pants During Ticket To Finale Task Stood On Pole For 15 Hours | Bigg Boss 15 : अरे देवा! देवोलिनाचा सुटला कंट्रोल, तरीही 15 तास पोलवर उभी राहून पूर्ण केला टास्क

Bigg Boss 15 : अरे देवा! देवोलिनाचा सुटला कंट्रोल, तरीही 15 तास पोलवर उभी राहून पूर्ण केला टास्क

googlenewsNext

बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) सध्या ‘टिकिट टू फिनाले’वरून घमासान सुरू आहे. फिनालेला काही दिवस उरले असताना  ‘टिकिट टू फिनाले’ मिळवण्यासाठी स्पर्धक काहीही करायला तयार आहे. नुकताच रश्मी देसाई (Rashami Desai)  व देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) या दोघींमध्ये  ‘टिकिट टू फिनाले’ टास्क रंगला. टास्क तसा सोपा. पण तो जसा जसा  पुढे गेला, तसा तसा कठीण बनंत गेला. होय, रश्मी व देवोलिना  दोघींनाही एका पोलला पकडून उभं राहायचं होतं. जी जास्तीत जास्त वेळ उभी राहिल,  ‘टिकिट टू फिनाले’ तिचं होणार,असा हा टास्क चांगलाच रंगला.

रश्मी व देवोलिना दोघीही जवळपास 15 तास पोलवर उभ्या होत्या. बिग बॉसनेही यासाठी दोघींचं कौतुक केलं. पण या टास्कदरम्यान एक वेळ अशीही आली की, देवोलिनाला कंट्रोल सुटला. तिने पँटमध्येच नैसर्गिक विधी आटोपला. वॉशरूमला जायचं तर देवोलिनाला टास्क सोडावा लागला असता, ते तिला मान्य नव्हतं. देवोलिनाने रात्रभर लघुशंका रोखून धरली. पण पहाटे ती कंट्रोल करू शकली नाही.

या टास्कदरम्यान स्पर्धकांनी या दोघींना पोलवरून हटवण्यासाठी बरंच टॉर्चर केलं. उमरने रश्मीला सपोर्ट केला तर प्रतिकने देवोलिनाला. लास्ट राऊंटमध्ये निशांतने देवोलिनाच्या पायांवर पाणी फेकलं. या फोर्समुळे ती घसरली आणि तिचा तोल गेल्याने ती टास्क हरली.
देवोलिना व रश्मीच्या या जबरदस्त रंगलेल्या टास्कमध्ये अखेर रश्मी जिंकली आणि थेट फिनालेत पोहोचली. पण देवोलिना ज्या जिद्दीने हा टास्क खेळली, त्यासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर अनेकांनी देवोलिनाचं कौतुक केलं आहे.

Web Title: Devoleena Bhattacharjee Peed In Her Pants During Ticket To Finale Task Stood On Pole For 15 Hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.