अखेर देवोलीना भट्टाचार्जीनं सांगितलं सीक्रेट मॅरेजबद्दल, या कारणामुळे शाहनवाज शेखसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:56 AM2022-12-20T11:56:58+5:302022-12-20T12:02:11+5:30

टीव्हीवरील गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जीने शाहनवाज शेखसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

Devoleena Bhattacharjee revealed reason of her secret marriage with Shahnawaz Sheikh in intimate ceremony | अखेर देवोलीना भट्टाचार्जीनं सांगितलं सीक्रेट मॅरेजबद्दल, या कारणामुळे शाहनवाज शेखसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

अखेर देवोलीना भट्टाचार्जीनं सांगितलं सीक्रेट मॅरेजबद्दल, या कारणामुळे शाहनवाज शेखसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ

googlenewsNext

टीव्हीच्या गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जीने 14 डिसेंबरला तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. देवोलीनानं कोर्ट मॅरेज केले आणि तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गेल्या दोन वर्षांपासून देवो व शाहनवाज एकमेकांना डेट करत होते. 

देवोलिना भट्टाचार्जीने आता तिच्या गुप्त लग्नाचे सीक्रेट उघड केलं आहे. लग्नानंतर तब्बल 6 दिवसांनी दिलेल्या मुलाखतीत देवोलीनाने तिच्या सीक्रेट लग्नाबाबत खुलासा केला आहे. देवोलीनानं सांगितले की, मला सीक्रेट लग्न करायचं होते. याच कारणामुळे देवोलीनाने तिच्या मैत्रिणींनाही तिच्या लग्नाबद्दल कळू दिले नाही. अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत देवोलीनाने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान मी आयुष्यातील अनेक कटू सत्ये अनुभवली आहेत. पैशाचे महत्त्वही माझ्या लक्षात आले.

देवोलीनाने सांगितले की, मी लग्नात खर्च न करण्याचा निर्णय घेतला होता. मला ते पटतं नाही. माझ्या कष्टाचे पैसे एका विशिष्ट दिवशी एकाच वेळी उडवणे हा माझ्यासाठी योग्य निर्णय नाही. त्याऐवजी मी माझ्या याच पैशातून गरजूंना मदत करू शकतो. यामुळे मला आनंदी जीवन जगण्याचा आशीर्वादही मिळेल. लग्न हा माझ्यासाठी मोठा दिवस होता.

मला हा दिवस माझ्या आईसोबत आनंदाने घालवायचा होता. याच कारणामुळे मी माझं लग्न खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला. देवोलीनानं पती शाहनवाज शेखचं आयुष्यात आल्याबद्दल आभार मानले आहेत. 

कोण आहे देवोलिनाचा पती?
देवोलिना भट्टाचार्जीटेलिव्हिजनचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आता ती शाहनवाज शेखची पत्नी आहे. शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. बिग बॉस 13 दरम्यान देवोलिनाने ती नात्यात असल्याचा खुलासा केला होता. मी घराबाहेर कुणाला तरी डेट करत असल्याचं तिने सांगितलं होतं. अर्थात त्याचा नावाचा खुलासा करणं तिने टाळलं होतं. देवोलिना व शाहनवाज यांची भेट जिममध्ये झाली. ‘साथिया’ शोदरम्यान देवोलिनाचा अपघात झाला होता. यादरम्यान शाहनवाज तिचा आधार बनला. त्याने तिला पुन्हा उठून उभं केलं. शाहनवाजच्या प्रेमळ स्वभावाने देवोलिनाचं मन जिंकलं आणि ती त्याच्या प्रेमात पडली. सुमारे दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

Web Title: Devoleena Bhattacharjee revealed reason of her secret marriage with Shahnawaz Sheikh in intimate ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.