"गेल्यावर्षीपासूनच लालबागचा राजाला जाणं बंद केलं...", देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:39 AM2024-09-13T10:39:04+5:302024-09-13T10:39:47+5:30

देवोलिनाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे.

Devoleena Bhattacharjee tweets saying why she stopped going for Lalbaugcha Raja since last year | "गेल्यावर्षीपासूनच लालबागचा राजाला जाणं बंद केलं...", देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं कारण

"गेल्यावर्षीपासूनच लालबागचा राजाला जाणं बंद केलं...", देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं कारण

मुंबईतील लालबागचा राजा मंडळातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. एकीकडे VVIP लोक आरामात उभं राहून फोटो काढत आहेत तर बाजूलाच सामान्य भाविकांना अक्षरश: ढकललं जात आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने (Devoleena Bhattacharjee)  ट्वीट करत ती आता लालबागचा राजच्या दर्शनाला जात नाही असा खुलासा केला. काय म्हणाली देवोलिना?

देवोलिना भट्टाचार्जीने ट्वीट करत लिहिले, "मी जवळपास १०-११ वर्षांपासून लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहे. पण गेल्या वर्षी मला जावंसंच वाटलं नाही. मला माहितीये की मी ओळखीने तिथे VVIP दर्शन घेऊन शकते. यासाठी मी आभारीच आहे. पण ज्याप्रकारे तिथे भाविकांसोबत वर्तवणूक केली जाते हे दृश्य पाहून वाईट वाटतं. अगदी वृद्ध पुरुष महिला, गरोदर महिला, लहान मुलं यांच्यासोबतही अशाच प्रकारे वर्तवणूक केली जाते. बाप्पा सर्वांचे आहेच आणि सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. या लोकांमुळे बाप्पा आता सेलिब्रिटी बाप्पा झाला आहे. लालबागचा राजासोबत माझं नातं आहेच आणि ते काय राहील. पण..." यासोबत तिने हार्टब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे.

देवोलिनाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. देवोलिना सध्या गरोदर आहे आणि काही महिन्यात पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दोन वर्षांपूर्वी ती शहनवाज शेखसोबत लग्नबंधनात अडकली. आंतरधर्मीय विवाह केल्याने तिला ट्रोलही करण्यात आलं. मात्र नुकतंच देवोलिना आणि शहनवाज यांनी घरी गणपती स्थापना केली. यावरुन त्यांचं कौतुक करण्यात आलं.

Web Title: Devoleena Bhattacharjee tweets saying why she stopped going for Lalbaugcha Raja since last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.