लॉकडाऊनमध्ये ही अभिनेत्री चक्क मागतेय दारू, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:46 PM2020-04-16T12:46:10+5:302020-04-16T12:53:13+5:30

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

devoleena bhattacharjee video regarding liquor got viral on social media PSC | लॉकडाऊनमध्ये ही अभिनेत्री चक्क मागतेय दारू, पाहा हा व्हिडिओ

लॉकडाऊनमध्ये ही अभिनेत्री चक्क मागतेय दारू, पाहा हा व्हिडिओ

googlenewsNext
ठळक मुद्देदेवोलिनाने या व्हिडिओला कॅप्शन देखील थोडीशी दारू पाहिजे अशीच दिले आहे. त्यासोबतच काही इमोजी देखील पोस्ट केले आहेत. हा व्हिडिओ एक लाख ४० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सध्या कोणत्याही मालिका अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नसल्याने सगळेच कलाकार आपापल्या घरात आहेत. कलाकार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ती रडत दारू मागताना दिसत आहे. देवोलिनाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड फनी असून या व्हिडिओत ती एका लहान मुलाच्या आवाजात बोलताना दिसत आहे. तसेच ती रडण्याचा अभिनय देखील करत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती तिला विचारताना दिसत आहे की, तुला काय पाहिजे, त्यावर देवोलिना अभिनय करत त्याला सांगत आहे की, मला थोडीशी दारू पाहिजे आहे आणि ती पुन्हा जोरजोरात रडताना दिसत आहे.     

देवोलिनाने या व्हिडिओला कॅप्शन देखील थोडीशी दारू पाहिजे अशीच दिले आहे. त्यासोबतच काही इमोजी देखील पोस्ट केले आहेत. हा व्हिडिओ एक लाख ४० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला असून हजारोहून अधिक लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केले आहे. 

Web Title: devoleena bhattacharjee video regarding liquor got viral on social media PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.