देवोलीना भट्टाचार्जीचं पार पडलं लग्न, सिंदूर-मंगळसूत्रातला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:09 IST2022-12-14T17:09:02+5:302022-12-14T17:09:41+5:30
Devoleena Bhattacharjee : देवोलिना भट्टाचार्जीच्या वधूतल्या गेटअपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

देवोलीना भट्टाचार्जीचं पार पडलं लग्न, सिंदूर-मंगळसूत्रातला फोटो आला समोर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून देवोलीना भट्टाचार्जी(Devoleena Bhattacharjee)ने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. देवोलिना भट्टाचार्जीने लग्न केले. आतापर्यंत तिचे लग्न एक प्रँक समजले जात होते. पण खरे तर देवोलीनाने कोर्ट मॅरेज केले आहे. तिचा मित्र विशाल सिंगने लग्नाला हजेरी लावली आणि अभिनेत्रीच्या लग्नाच्या वृत्ताला दुजारो दिला. देवोलीनाने हळदी समारंभाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.
अभिनेत्रीने देवोलीना भट्टाचार्जीने इन्स्टा स्टोरीवर तिचे फोटो शेअर केले आहेत. देवोलीनाला नववधूच्या रूपात पाहिले जाते. बांगड्या, कडा, कलीरे, कपाळावर माँगटिका, मंगळसूत्र, कानातले, नेकपीस, बिंदी लावलेली... देवोलीना पूर्ण मेकअप करून गाडीत बसली आहे. देवोलीनानेही मास्कही घातल्याचे पाहायला मिळत आहे.
देवोलीनाने तिची मेहंदी दाखवतानाही व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या मेहंदी चांगली रंगली आहे. देवोलीनाने एका व्यक्तीचा हात धरलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांच्या हातात अंगठ्या आहेत. आतापर्यंत अभिनेत्रीच्या वराबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
देवोलीनाला ब्राइडल लूकमध्ये पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. देवोलिना नववधू झाली आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. कारण तिच्या लग्नाची कोणतीही चर्चा नव्हती. अचानक मंगळवारी देवोलीनाचा हळदीचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर बुधवारी अभिनेत्रीने ब्राइडल लूकमधील एक फोटो शेअर केला. या सगळ्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की देवोलीनाचा वर कोण आहे? देवोलिना कोणाची वधू बनली यावर सस्पेन्स कायम आहे.