'दिया और बाती' फेम अनस रशिदने केला हिनासह साखरपूडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 07:14 AM2017-04-17T07:14:02+5:302017-04-17T12:44:02+5:30
नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच लग्नाची तारीखही निश्चीत होणार असल्याचे अनसने सांगितले आहे.'दिया और बाती' मालिकेतील अनसने साकारालेली भूमिका अनसच्या सारच्यामंडळींनाही खूप आवडली होती.
' ;दिया और बाती' फेम अनस रशिदचा हिनासोबत साखरपूडा पार पडला. हिनाही मुळची चंदीगढ येथे राहणारी ती अनस पेक्षा 14 वर्षाने लहान आहे.अनसच्या आईने हिना आणि अनस यांची भेट घडवून आणली होती. ते दोघे केवळ काहीच दिवसांपूर्वी भेटले असून पहिल्याच भेटीत अनसला हिना आवडली आणि त्याने लगेचच लग्नासाठी होकार कळवला. हिना ही अनसच्या क्षेत्रातील नसून ती कॉर्पोरेट जगतातील आहे. चंडिगडमधील एका कंपनीत ती एचआर डिपार्टमेंटमध्ये काम करते.अनसने नुकतेच साखरपुड्याचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फोटोमध्ये अनस डार्क कलरच्या शेरवानीमध्ये तर हिना यलो कलरच्या इंडियन आउटफिटमध्ये दिसत आहे.अनसने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यापासून त्याला चांगल्या प्रतिक्रीया मिळत आहे.अनसने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला आहे. काही दिवस तो पंजाबमध्ये कुटुंबियांसह निवांत वेळ घालवतोय.आता तो लग्नाच्या तयारी करण्यात बिझी झाला आहे. नुकताच साखरपुडा झाला असून लवकरच लग्नाची तारीखही निश्चीत होणार असल्याचे अनसने सांगितले आहे.'दिया और बाती' मालिकेतील अनसने साकारालेली भूमिका अनसच्या सारच्यामंडळींनाही खूप आवडली होती. त्यामुळे जसे हिनासाठी अनसचे स्थळ आले त्यावेळी विचार करण्याचा प्रश्न नव्हताच अशा प्रतिक्रीया त्याच्या सारच्यामंडळींकडून कळतायेत. आता फक्त अनस कधी बोहल्यावर चढतो याचीच उत्सुकता त्याच्या कुटूंबियांना लागली आहे.दिया और बाती मालिकेत संध्या आणि सूरज यांच्या रोमँटीक केमिस्ट्रीने रसिकांच्या मनात घर केले होते. त्यामुळे मालिका संपल्यानंतरही आजही रसिक संध्या आणि सूरजला यांना विसरलेले नाहीत.त्यामुळे आजही मालिकेचा सिक्वेल तू सूरज मैं सांज पिया जी सुरू होवूनही 'दिया औऱ बाती'च्या मालिकेच्या टीमला रसिक आजही विसरलेले नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळतंय.