'एखाद्याचा बाप काढायची महाराष्ट्राची संस्कृती नाही..'; धनंजय पोवार गरजला, निक्कीची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:18 AM2024-09-05T10:18:11+5:302024-09-05T10:50:24+5:30

काल बिग बॉसच्या घरात निक्कीने जान्हवीला सुनावताना बापाचा उल्लेख केला. त्यामुळे DP दादा तिच्यावर चांगलाच भडकलेला दिसला

dhananjay powar dp dada angry on nikki tamboli bigg boss marathi 5 | 'एखाद्याचा बाप काढायची महाराष्ट्राची संस्कृती नाही..'; धनंजय पोवार गरजला, निक्कीची बोलती बंद

'एखाद्याचा बाप काढायची महाराष्ट्राची संस्कृती नाही..'; धनंजय पोवार गरजला, निक्कीची बोलती बंद

बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवशी नवीन राडे होताना दिसतात. कधी कधी इतरांना सुनावताना काही स्पर्धकांची जीभही घसरलेली दिसली. जान्हवीला यामुळे एक आठवडा जेलची शिक्षा भोगावी लागली. परंतु तरीही काही सदस्यांच्या वागण्या-बोलण्यात सुधारणा झालेली दिसत नाही. बिग बॉसच्या घरात कालही निक्की तांबोळीची जीभ चांगलीच घसरलेली दिसली. तेव्हा DP दादाने तिच्यावर निशाणा साधत तिला सुनावलेलं दिसलं.

DP ने जान्हवीला दिली समज

काल जान्हवीने निक्कीला जेवण देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता. जान्हवीच्या या म्हणण्याला घरातील इतर सदस्यांनीही साथ दिली. त्यामुळे निक्कीचा चांगलाच पारा चढला. तिने बापावरुन एक वाक्य वापरलं, यामुळे गार्डन एरियात जेवण करत असलेला DP दादा भडकलेला दिसला. तो निक्कीला म्हणाला, "कोणाच्याही बापावर जाऊ नको. तो अधिकार तुला नाही. बापाबद्दल सगळेच इथे इमोशनल असतात. तू कोणाचा बाप काढू नको." निक्की DP दादाला म्हणाली, "तुम्ही मला सांगू नका."


बाप काढायची संस्कृती आपली नाही

पुढे निक्की DP दादाशी वाद घालत राहिली. "तुम्ही माझा गळा नाही पकडू शकत", असं ती वैतागून म्हणाली. पुढे DP दादा म्हणाला, "तुला स्वतःवर तेवढा कंट्रोल ठेवावा लागणार. एखाद्याचा बाप काढण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही." असं DP दादा तिला म्हणाला. पुढे छोटा पुढारीनेही निक्कीला समजावलं. नंतर निक्की शांत झाली. DP दादाच्या या कृतीचं चांगलं कौतुक होतंय. आता निक्कीला शनिवारी रितेश देशमुख या मुद्द्यावरुन सुनावणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

Web Title: dhananjay powar dp dada angry on nikki tamboli bigg boss marathi 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.