अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार डीपी दादा, म्हणाला, "भाऊ म्हणून लग्नात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:24 PM2024-10-15T12:24:38+5:302024-10-15T12:25:43+5:30

अंकिता वालावलकर ही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

Dhananjay Powar On Ankita Walawalkar And Kunal Bhagat Marriage Gift | अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार डीपी दादा, म्हणाला, "भाऊ म्हणून लग्नात..."

अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार डीपी दादा, म्हणाला, "भाऊ म्हणून लग्नात..."

Dhananjay Powar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचवे पर्व चांगलंच गाजलं. यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. 'बिग बॉस' संपलं पण स्पर्धक मात्र आताही चर्चेत आहेत. यंदाच्या पर्वातील अंकिता वालावलकर ही आता लग्न बंधनात अडकणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना तिने लवकरच लग्न करणार असं सांगितलं होतं. पण कुणाशी करणार याचा खुलासा केला नव्हता. आता काही दिवसांपुर्वी तिने होणाऱ्या नवऱ्याबद्दल आणि लग्न कोणत्या महिन्यात करणार हे चाहत्यांना सांगितलं. आता सध्या तिच्या लग्नाचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. यातच अंकिताला बहिण मानत असलेल्या धनंजय पोवारने तिला लग्नात काय आहेर देणार, याचा खुलासा केला. 

'बिग बॉस'च्या घरात धनंजय आणि अंकिता यांच्यात भाऊ आणि बहिणीचे नाते पाहायला मिळालं. दोघांनीही अगदी पहिल्यादिवसापासून एकमेंकाची साथ निभावली. 'बिग बॉस'च्या बाहेरही ते भाऊ आणि बहिणीचे नाते जपणार आहेत. आता अंकिताच्या लग्नातही एक भाऊ म्हणून जे काही करता येईल, ते करणार, असे धनंजयने म्हटलं आहे. 

नुकतंच धनंजय पोवारने 'मीडिया टॉक मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत धनंजय पोवार विनोदात म्हणाला, "अंकिताला लग्नात आहेर काय द्यायचा, ती दिसते तशी नाही. जरा आगाऊ आहे. मला ती सोफा मागेल, साडी देऊन काय सात-आठ हजारांत तिचे भागेल असं मला वाटत नाही. पण, एक भाऊ म्हणून लग्नात हजर राहणार आहे, तेव्हा ११०० रुपयांचं पाकीट वगैरे देईन", असे धनंजय गमीतमध्ये म्हणाला. पुढे तो म्हणाला, "बघू, भाऊ म्हणून जे काही करता येईल, ते चांगल्या पद्धतीने करू".


अंकिता वालावलकर ही संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्याशी  लवकरच लग्न करणार आहे.  अंकिता ही सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय आहे. 2016 मध्ये ती करिअरसाठी मुंबईत आली आणि इथे तिने स्वत:ची वेगळी ओळख बनवली. अंकिताने 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. या शोमधील तिची खेळी सर्वांनाच खूप आवडली. टॉप 5 स्पर्धकांपर्यंत ती पोहोचली होती. मात्र या सिझनचं विजेतेपद पटकावण्यात सूरज चव्हाण यशस्वी ठरला.

Web Title: Dhananjay Powar On Ankita Walawalkar And Kunal Bhagat Marriage Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.