धनश्री कांडगावकरने शेअर केला बाळाचा फोटो, दिसली बाळाची झलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 12:58 PM2021-02-27T12:58:25+5:302021-02-27T12:59:23+5:30
धनश्रीने आता तिच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील नंदिता वहिनी या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकरच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचं आगमन झालं. धनश्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी तिने सोशल मीडयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने आता तिच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
धनश्रीच्या हातात आपल्याला तिचे छोटेसे बाळ पाहायला मिळत आहे. या बाळाचा चेहरा दिसत नसला तरी बाळाची झलक आपल्याला दिसत आहे. धनश्री आणि तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोला काहीच तासांच 39 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
धनश्रीच्या या नव्या प्रवासासाठी तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. सामान्य लोकच नव्हे सेलिब्रेटी देखील या फोटोवर कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत.
धनश्री प्रेग्नेंट असल्याचं समोर आल्यापासून ती नेहमीच बेबी बम्पचे फोटो शेअर करत होती. बाळाच्या आगमनाची काडगावकर कुटुंबासह चाहत्यांना ही तितकीच उत्सुकता होती.
धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते. धनश्रीला ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती गंध फुलांचा गेला सांगून, जन्मगाठ या मालिकांमध्ये झळकली. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. ‘झोपी गेलेला जागा झाला’ आणि ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकांमधून धनश्रीने काम केले आहे.