धर्मेशने केली आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 07:35 PM2018-11-02T19:35:27+5:302018-11-02T19:36:00+5:30

स्टार प्लसवरील डान्स प्लस ४ कार्यक्रमातील सर्वांचा आवडता परीक्षक धर्मेश येलांडे याने येत्या दिवाळीसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Dharmesh has celebrated Diwali with a mysterious way! | धर्मेशने केली आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी!

धर्मेशने केली आगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी!

googlenewsNext
ठळक मुद्देधर्मेशने कर्करोगग्रस्त मुलांना दिल्या भेटवस्तू

स्टार प्लसवरील डान्स प्लस ४ कार्यक्रमातील सर्वांचा आवडता परीक्षक धर्मेश येलांडे याने येत्या दिवाळीसाठी घेतलेल्या एका निर्णयामुळे असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. धर्मेशने काही स्पर्धकांसह अ‍ॅक्सेस लाईफ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतील मुलांची भेट घेऊन त्यांना आनंदाचा धक्काच दिला आहे. ज्या मुलांना लहानपणीच कर्करोग झाला असून ते आपल्या आई-वडिलांसह या दुर्धर रोगाचा सामना करीत आहेत, अशा मुलांची ‘अ‍ॅक्सेसलाईफ फाऊंडेशन’ देखभाल करते.


धर्मेशला पाहिल्यावर या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. इतकेच नव्हे, तर धर्मेशने या मुलांसाठी विविध भेटवस्तू आणल्या होत्या. तो या मुलांशी काही काळ खेळला आणि अर्थातच त्याने नृत्य केल्याशिवाय त्याची ही भेट परिपूर्ण कशी झाली असती. त्यामुळे त्याने काही लोकप्रिय गीतांच्या तालावर या मुलांबरोबर नृत्यही केले. याबाबत धर्मेशने सांगितले, “यंदाची दिवाळी हा एक वेगळाच अनुभव होता. या मुलांबरोबर काही काळ व्यतीत केल्यावर मला मी
घरी आल्यासारखे वाटले. त्यांना हसताना आणि खेळताना पाहणे हीच माझी सर्वोत्तम दिवाळी भेट होती. परिस्थिती कोणतीही असो, तिच्यात आनंद शोधला पाहिजे, ही शिकवण मी या मुलांकडून घेतली. ही मुले आमच्या कार्यक्रमात येऊ शकली आणि त्यांनी त्यात भाग घेतला, तर मला फार आनंद होईल. यंदाच्या दिवाळीत मी केलेली ही सर्वोत्तम गोष्ट होती आणि मला तिथे पुन्हा जायला आवडेल.”
शेवटी तो म्हणाला, “तुम्हा सर्वांना ही दीपावली आनंदाची आणि सुरक्षेची जावो. तसेच तुम्ही नाचत राहा!” 

Web Title: Dharmesh has celebrated Diwali with a mysterious way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.