​दिया और बाती हम फेम दीपिका सिंग बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2017 06:38 AM2017-03-06T06:38:44+5:302017-03-06T13:53:50+5:30

​दिया और बाती हम फेम दीपिका सिंग लवकरच आई होणार आहे. तिने ही बातमी स्वतः सोशल नेटवर्किंग साइटवरून दिली आहे. तिने 2014 मध्ये दिया और बाती हम या मालिकेचा दिग्दर्शक रोहित राज गोयलशी लग्न केले होते.

Dia and Baati, we came to become the Fame Deepika Singh | ​दिया और बाती हम फेम दीपिका सिंग बनणार आई

​दिया और बाती हम फेम दीपिका सिंग बनणार आई

googlenewsNext
या और बाती हम या मालिकेत संध्या राठी ही भूमिका साकारणारी दीपिका सिंग लवकरच आई होणार आहे. दीपिका आई होणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. पण तिने याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. पण आता तिने स्वतः ही बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. दीपिका आणि तिचा पती रोहित राज गोयल घरात येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहे. 
दीपिकाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. दिपिकाचे बेबी बम्प या व्हिडिओत आणि फोटोत दिसत असून या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजाराहूनही अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच दीडशेहून अधिक लोकांनी यावर कमेंट दिल्या आहेत. 
दीपिका नेहमीच तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते. तिच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या अकाऊंटला हजारोहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.पण नुकतेच तिचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि याबाबत तिच्या चाहत्यांकडूनच तिला कळले होते. त्यामुळे तिने तिचे फेसबुक अकाऊंट सध्या बंद केले आहे आणि ती इन्स्टाग्राम या अकाऊंटवरून तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहात आहे. तिने त्यामुळे ही गोड बातमी इन्स्टाग्रामवरूनच शेअर केली आहे. 
दीपिका आणि रोहित यांचे लग्न 2014 मध्ये धुमधडाक्यात झाले होते. रोहित हा तिच्या दिया और बाती हम या मालिकेचा दिग्दर्शक होता. या दोघांची या मालिकेच्या सेटवरच ओळख झाली होती आणि ते प्रेमात पडले होते. मालिकेच्या सेटवर रोहित हा प्रियकर नसून केवळ माझा दिग्दर्शक असायचा असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.  
 

Web Title: Dia and Baati, we came to become the Fame Deepika Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.