'लव का पंगा'च्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या लगावली कानशीलात?, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: October 8, 2020 08:53 PM2020-10-08T20:53:01+5:302020-10-08T20:53:44+5:30

आशा नेगी आणि अंश बागरी 'लव का पंगा' या शोमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Did Asha Negi slap Ansh Bagri on the sets of upcoming show, Love Ka Panga? | 'लव का पंगा'च्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या लगावली कानशीलात?, जाणून घ्या याबद्दल

'लव का पंगा'च्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या लगावली कानशीलात?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

हंगामा प्लेच्या लव का पंगा या आगामी ओरिजनल रोमँटिक शोमध्ये टीव्ही अभिनेत्री आशा नेगी एका शहरी आधुनिक तरुणीची भूमिका बजावणार आहे. तिच्यासोबत अंश बागरी या शोमध्ये दिसणार आहे.

आधुनिक काळातील प्रेमाची कथा असलेल्या या शोमध्ये अंशने सुमीत या हरयाणवी देसी छोरा साकारला आहे तर आशा नेगीने दिल्लीतील आधुनिक नेहा या तरुणीची भूमिका साकारली आहे. मनालीच्या निसर्गरम्य परिसरात चित्रित या कथेत दोन तरुण व्यक्तिरेखा योगायोगाने घडणाऱ्या घटनांमुळे कुणी कल्पनाही करणार नाही, अशा पद्धतीने एकमेकांच्या आयुष्यात येतात. या शोचे चित्रिकरण प्रत्येकासाठीच फार छान अनुभव असला तरी अंश बागरीला एक वेगळाच प्रसंग लक्षात राहिलाय. आशा नेगीने चुकून त्याला अपेक्षेपेक्षा अधिक जोराने मारले होते.

या प्रसंगाबद्दल अंश बागरी म्हणाला, "हो. एक प्रसंग असा आहे ज्यात आम्ही दोघांनीही मद्यपान केले आहे आणि आपापल्या घरी जाताना आमचे पाय लटपटताहेत. मात्र, चुकून तोल जातो आणि सुमीत म्हणजे मी नेहावर पडतो आणि ती चटकन मला कानाखाली मारते. पण, मला वाटतं आशा फारच भूमिकेत शिरली आणि तिने अपेक्षेपेक्षा अधिकच जोराने माझ्या कानाखाली मारली. क्षणभरातच तिच्या लक्षात आलं काय झालं ते आणि आपली चूक झाली हे मान्य करून ती लगेच माफी मागू लागली. खरंतर हा प्रसंग इतका विनोदी होता आणि आताही आम्ही सगळे त्यावर हसतो, हे मला छान वाटतं."


अब्युझ ओरिजनल निर्मित आणि नितेश सिंग दिग्दर्शित लव का पंगा 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल आणि हंगामा प्ले आणि भागीदार नेटवर्क्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

 

Web Title: Did Asha Negi slap Ansh Bagri on the sets of upcoming show, Love Ka Panga?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.