‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम नवं आव्हान स्वीकारताना किर्ती देईल का त्याची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 13:07 IST2021-05-15T12:54:57+5:302021-05-15T13:07:25+5:30
फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम नवं आव्हान स्वीकारताना किर्ती देईल का त्याची साथ
फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. शुभम, किर्ती, जीजी अक्का ही पात्रं तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहेत. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत लवकरच एक चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शुभम उत्तम शेफ आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. शिर्डीमध्ये त्याने बनवलेल्या मिठाईला खास मागणी असते. ज्या शिर्डी शहराला शुभमच्या हातच्या चवीने वर्षानुवर्ष मोहित केलं तीच चव आता जगाला मोहित करण्यासाठी सज्ज होतेय. जागतिक दर्जाच्या ‘इंडियाज बेस्ट कूक’ या पाककला स्पर्धेमध्ये शुभमने भाग घ्यावा यासाठी कीर्तीची धडपड सुरु आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जीजी अक्कांचा नकार आहे. शुभमही मनापासून राजी नाही. त्यामुळे जीजी अक्का आणि शुभमला या स्पर्धेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कीर्तीने कंबर कसली आहे. शुभमचं नाव जगभरात व्हावं हेच स्वप्न उराशी बाळगून कीर्ती हा सारा खटाटोप करते आहे.
आता कीर्तीच्या या प्रयत्नांना यश मिळणार का? शुभम या पाककला स्पर्धेसाठी कशी तयारी करणार आणि या स्पर्धेत तो आपली चमक दाखवणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. मालिकेत पाककला स्पर्धेचा हा रोमांचक प्रवास पहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठीसुद्धा अनोखी पर्वणी ठरणार आहे