​अमृता सुभाषच्या नवीन इनिंगबद्दल तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:18 AM2018-02-05T11:18:50+5:302018-02-05T16:48:50+5:30

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्ये देखील आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या भूमिकांसाठी तिला आजवर अनेक ...

Did you hear about Amrita Subhash's new inning? | ​अमृता सुभाषच्या नवीन इनिंगबद्दल तुम्ही ऐकले का?

​अमृता सुभाषच्या नवीन इनिंगबद्दल तुम्ही ऐकले का?

googlenewsNext
ृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्ये देखील आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या भूमिकांसाठी तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. किल्ला, श्वास यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांचे आजवर कौतुक झाले आहे. आता ती मैं अॅल्बर्ट अॅनस्टान बनना चाहता हूँ या तिच्या आगामी चित्रपटात एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे. अमृता ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक खूप चांगली गायिका असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. अमृताचा आवाज खूपच चांगला आहे. आता ती कट्टी बट्टी या मालिकेचे शीर्षक गीत गाणार आहे. या मालिकेचे शीर्षक गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे शीर्षक गीत अमृता आणि स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. कोणत्याही मालिकेचे शीर्षकगीत गाण्याची अमृताची ही पहिली वेळ आहे. अमृताच्या अभिनयाच्या इनिंगप्रमाणे तिच्या फॅन्सना तिची ही नवीन इनिंग देखील आवडेल अशी अमृताला खात्री आहे. 
कट्टी बट्टी या मालिकेत अश्विनी कासार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कमला या मालिकेत प्रेक्षकांना अश्विनीला नेहमी साड्यांमध्येच पाहायला मिळाले होते. पण कट्टी बट्टी या मालिकेतील तिचा लूक हा कमला या मालिकेतील तिच्या लूकपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या मालिकेचे कथानक हे मराठवाड्याशी संबंधित असल्याने या मालिकेचे चित्रीकरण हे सध्या अहमदनगर येथेच सुरू आहे आणि या मालिकेचे कलाकार देखील याच परिसरातील आहेत. या मालिकेत अनेक नवोदित कलाकार आहेत. या मालिकेविषयी अश्विनी सांगते, कमला या मालिकेपेक्षा या मालिकेतील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. एक वेगळी आणि एक धमाल भूमिका साकारायला मिळत असल्याने या मालिकेत मी काम करण्याचे ठरवले. या मालिकेचे चित्रीकरण सध्या अहमदनगर येथे सुरू असून तेथील एका गावात आम्ही चित्रीकरण करत आहोत. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे.
कट्टी बट्टी ही मालिका लवकरच झी युवा या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : पालकांनो ‘खडूस’ बनू नका : अमृता सुभाष

Web Title: Did you hear about Amrita Subhash's new inning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.