'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकार एका भागासाठी घेतात इतकं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 07:00 AM2022-03-22T07:00:00+5:302022-03-22T07:00:02+5:30

मालिकेतील दोन बालकार दीपिका आणि कार्तिकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Did you know Deepika and Karthiki, child actors in 'Rang Mazha Vegla' serial, get this much amount for one episode | 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकार एका भागासाठी घेतात इतकं मानधन

'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकार एका भागासाठी घेतात इतकं मानधन

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.  एकीकडे नुकतेच कार्तिक दीपाला तो कधीच बाबा होऊ शकत नाही, हे सांगतो तर आता दुसरीकडे दीपिकाला ती अनाथ असल्याचे समजते आणि ती घर सोडून जाते. मालिकेत दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते आहे. 

मालिकेतील दोन बालकार दीपिका आणि कार्तिकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिकाची भूमिका मालिकेत स्पृहा दळी साकारतेय तर कार्तिकीची भूमिका साईशा भोईर. दीपिकाची भूमिका साकारत असलेली स्पृहा ही अभिनेत्री वेदश्री दळी हिची मुलगी आहे. स्पृहाची ही पहिलीच मालिका आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेत एका एपिसोडसाठी जवळपास तिला 12 हजार रुपयांचं मानधन मिळत असल्याची माहिती आहे. ऑनलाईन शाळा सुरु असल्यामुळे स्पृहाला या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

साईशाबद्दल बोलायचे झाले तर तिचीही स्पृहा प्रमाणे पहिलीच मालिका आहे. साईशाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 91 हजाराहुन अधिक फॉलोवर्स आहेत. साईशला ही एका एपिसोडसाठी स्पृहा इतकचं मानधन मिळत असल्याची माहिती आहे. 

Web Title: Did you know Deepika and Karthiki, child actors in 'Rang Mazha Vegla' serial, get this much amount for one episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.