चिंटू सिनेमातील नेहाला आता ओळखणं झालंय खूपच कठीण, ती आहे या प्रसिद्ध कलाकाराची लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:00 IST2022-07-07T06:00:00+5:302022-07-07T06:00:02+5:30
चिंटूमधील नेहा आता बरीच मोठी झाली आहे. मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध कलाकाराची ती मुलगी आहे.

चिंटू सिनेमातील नेहाला आता ओळखणं झालंय खूपच कठीण, ती आहे या प्रसिद्ध कलाकाराची लेक
श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित “चिंटू” हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता त्यानंतर २०१३ साली चिंटू 2 हा आणखी एक चित्रपट त्यानी प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हे दोन्ही चित्रपट खूपच लोकप्रिय झाले होते. चिंटू आणि त्यांच्या मित्राच्या करामती या दोन्ही चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळाल्या होत्या. या दोन्ही चित्रपटात नेहाची भूमिका साकारली होती बालकलाकार “रुमानीने. सध्या ती झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेत महत्वाची भूमिका साकारतेय.
तू तेव्हा तशी मालिकेत रुमानी खरे राधाची भूमिका साकरते आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय देखील झाली आहे. याआधी रुमानीने नाटाकतही काम केलं आहे. 2019 मध्ये ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रूमानीला अभिनयासोबतच तिला डान्सचीही आवड आहे. रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेते आहे.
कोण आहे रुमानी?
रुमानी कोण तर प्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) यांची मुलगी आहे. संदीप खरे यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या जोडीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली. 'अग्गोबाई ढग्गोबाई', 'कधी हे कधी ते', 'तुझ्यावरच्या कविता', 'आरस्पानी' हे त्यांचे कविता संग्रहही प्रसिद्ध आहेत. आयुष्यावर बोलू काही हा त्यांचा कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता.
रुमानी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांपैकी एक आहे. ती तिचे फोटो सोशल मीडियावर पेजवर शेअर करत असते. सोशल मीडियावर रुमानीचा मोठा चाहता वर्ग आहे.