'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा असा होणार शेवट, आज प्रेक्षकांचा घेणार निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:16 AM2022-04-09T11:16:03+5:302022-04-09T11:20:27+5:30
झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे.
झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. दरम्यान 'रात्रीस खेळ चाले 3' ही मालिका अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आज या मालिकेचे शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.
अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप आधींच्या भागामध्ये भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अत्रुप्त आत्म्यानी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको. या सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. आज शेवटच्या भागात नाईक कुटुंब आनंदाने पुन्हा एकत्र राहताना आपल्याला दिसणार आहे.
'रात्रीस खेळा चाले 3'सह 'घेतला वसा टाकू नको' हा कार्यक्रमदेखील संपणार आहे. त्याचाही आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. 'घेतला वसा टाकू नको'च्या जागी आदेश बांदेकरांचा महामिनिस्टर हा कार्यक्रमा 11 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.