‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता संजय पाटील अडकला लग्नबंधनात, जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 04:12 PM2022-03-29T16:12:51+5:302022-03-29T16:30:41+5:30
मालिकेतील कलाकरांनी संजय पाटीलच्या लग्नातले फोटो शेअर केलेत. संजयवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh mhanje nakki kay asta). ही मालिका सुरु होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, दरवेळी मालिक येणाऱ्या चढउतारांमुळे ही मालिका रंजक होत आहे. या मालिकेतील एक अभिनेता नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
या मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील (Actor Sanjay Patil Engagement) नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर पत्नीसोबतचे लग्नात काही फोटो पोस्ट केले आहेत. प्रत्येक प्रेमकथा सुंदर असते, पण आपली माझी आवडती आहे. असे कॅप्शन त्याने लग्नाचे फोटो शेअर करताना दिले आहे. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे.
संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा 5नोव्हेंबर 2021रोजी पार पडला.अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. तसेच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे. या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.