Aishwarya Raiसोबत काम केलेली ही मुलगी आज आहे टीव्हीवरील सुपरस्टार, ओळखलंत का तिला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 03:42 PM2022-07-07T15:42:14+5:302022-07-07T15:48:55+5:30
Popular Tv Actress Childhood Photo: ऐश्वर्या रायसोबत काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
Popular Tv Actress Childhood Photo: बॉलिवूड आणि टेलिव्हिजनवरील असे बरेच कलाकार आहेत ज्यानी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकार(childhood actor) म्हणून केली. हे बालकार आता बरेच मोठे झालेत त्याचे सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंगदेखील आहे.आम्ही आज तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांंगणार आहोत जी ऐश्वर्या राय बच्चनसोबत 'कुछ ना कहो'(kuch na kaho) सिनेमात दिसली होती. तिने यात पूजाची भूमिका साकारली होती. तिने फक्त ऐश्वर्या रायसोबतच नाही तर राणी मुखर्जी, आमिर खानसोबत सुद्धा काम केलं आहे.
ओळलंत का तुम्ही या अभिनेत्रीला, चला आम्ही तुम्हाला आणखी एक हिंट देतो सध्या ही बालकलाकार टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट (Jennifer Winget) हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे. वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.
ती लहानपणापासून टीव्हीवर काम करते. सरस्वती चंद्रमधील कुमुद देसाई, बेहदमधील माया मेहरोत्रा आणि बेपनाह मधील झोया सिद्दिकीच्या भूमिकेत 36 वर्षीय जेनिफर विंगेटची भूमिका प्रेक्षकांना आवडली. बेहादनंतर ती बेहद २ च्या सिक्वेलमध्येही दिसली. यामध्ये त्यांचे सहकलाकार आशिष चौधरी आणि शिवीन नारंग होते.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिचा जन्म मुंबईत अर्ध्या मराठी आणि अर्ध्या ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव हेमंत विंगेट आणि आईचे नाव प्रभा विंगेट आहे. त्याचे वडील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे. त्याच्या मोठ्या भावाचे नाव मोझेस विंगेट आहे. 2005 मध्ये तिने तिचा को-स्टार करण सिंग ग्रोव्हरला डेट करायला सुरुवात केली. 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोच्या सेटवर तिची भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ९ एप्रिल २०१२ रोजी करण आणि जेनिफर दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या 2 वर्षानंतर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.