या चिमुरडीला ओळखलंत का?, 'इंडियन आयडॉल'मधून पोहचली घराघरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 07:41 PM2021-07-05T19:41:12+5:302021-07-05T19:42:04+5:30
या चिमुरडीला इंडियन आयडॉलमधून देशभरात लोकप्रियता मिळाली.
अंजली गायकवाड हिने २०१७ मध्ये पार पडलेल्या सारेगामापा लिटिल चॅम्प्स या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ती इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतील अंजली ही सर्वात कमी वयाची स्पर्धक होती. शास्त्रीय संगीताने सर्वांना भुरळ पाडणारी अंजलीच्या चाहत्यांचा वर्ग देखील मोठा आहे. मात्र इंडियन आयडॉलमध्ये झालेल्या एलिमिनेशनमध्ये अंजली स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी या शोच्या निर्मात्यांना खूप ट्रोल देखील केले होते. याआधीही अंजलीने तिच्या बहिणीच्या साथीने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात बाजी मारली होती. दरम्यान आता अंजलीने इंस्टाग्रामवर संगीत सम्राट शोमधील काही फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
अंजली गायकवाड हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर संगीत सम्राट शोमधील काही फोटो शेअर करत लिहिले की, सर्वांना हॅलो...अचानक अनपेक्षितपणे आजचा दिवस खूप आनंदी ठरला. कारण आई पप्पा टीव्ही पाहत होते आणि चॅनेल बदलता बदलता झी युवा वाहिनी लावली आणि त्यावर दीड तासांचा शो ज्याक आमचा संगीत सम्राटमधील प्रवास रेखाटलेला शो स्वररागिनी नंदिनी अंजली पुनः प्रसारीत करण्यात आला होता. ते पाहून खूपच अप्रतिम वाटले. मी आणि नंदिनी खूप आभारी आहोत.
अंजलीने तिच्या संगीत प्रवासाबद्दल सांगितले होते की,, ‘माझ्या घरातच सुरुवातीपासून संगीतमय वातावरण होते. माझे वडीलच माझे गुरु आहेत. ते घरीच मुलांना गायनाचे धडे देतात. मी तीन वर्षांचे होते, तेव्हापासून संगीत ऐकत आणि समजून घेत होते. माझ्या वडिलांनी माझ्यातील कला ओळखली आणि त्यांनी स्वतःच मला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
माझी बहिण नंदिनी माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठी आहे. खरे सांगायचे तर मी माझ्या ताईला बघूनच या क्षेत्रात आल्याचे ती सांगते.