फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 18:00 IST2024-05-04T18:00:00+5:302024-05-04T18:00:00+5:30
कलाकारांना अभिनय करताना स्क्रीप्टनुसार गेटअप करावा लागतो. कधी कधी त्यांना त्या गेटअपमध्ये ओळखणंदेखील कठीण होते. असाच एक अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याला ओळखणं कठीण झाले आहे.

फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
कलाकारांना अभिनय करताना स्क्रीप्टनुसार गेटअप करावा लागतो. कधी कधी त्यांना त्या गेटअपमध्ये ओळखणंदेखील कठीण होते. असाच एक अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याला ओळखणं कठीण झाले आहे. त्याचा हा अवतार पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हा अभिनेता म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे (Gaurav More). गौरव मोरे बाहुबलीतील एका पात्राचा वेश धारण केला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे सध्या मॅडनेस मचाएंगेमध्ये कॉमेडीची दमदार बॅटिंग करत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हिंदी शो मधून सध्या गौरव प्रेक्षकांना मोहित करतो आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याचा विचित्र अवतारातील फोटो शेअर केला आहे. यात त्याने बाहुबलीतील एका पात्राचा वेश धारण केला आहे. यात त्याला ओळखणं कठीण झाले आहे.
मॅडनेस मचाएंगे शोच्या नव्या एपिसोडमध्ये नुकतेच त्याने भुलभुलैयामधल्या छोट्या पंडितचा वेश धारण केला आहे. त्याचे हे सादरीकरण पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मॅडनेस मचाएंगे शोमधून गौरव मोरे तुफान लोकप्रिय होत असून मराठी प्रमाणे हिंदीत सुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरीतून प्रेक्षकांना आपलंसे केले आहे.
आगामी प्रोजेक्ट
गौरव मोरेच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर तो'अल्याड पल्याड' या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय 'महापरिनिर्वाण' या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.