माकडाच्या गेटअपमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये करतीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 19:35 IST2023-05-02T19:34:26+5:302023-05-02T19:35:01+5:30
Marathi actress: सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

माकडाच्या गेटअपमधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये करतीये काम
मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी वाट्टेल ते करतात. त्यामुळेच या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात राहतो आणि ही कलाकार मंडळी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतात. यामध्येच सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक अभिनेत्री चर्चेत येत आहे.
सध्या सोशल मीडियावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतील एका अभिनेत्रीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने माकडाचा गेटअप केला आहे. त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री चेतना वाघ हिचा आहे. एका स्किटसाठी तिने हा गेटअप केला होता. विशेष म्हणजे तिने हा गेटअप उत्तमरित्या कॅरी केला होता. त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. चेतना भट ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. चेतनाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.