लग्नानंतर भारती सिंगचा पहिला फोटो तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 10:31 AM2017-12-08T10:31:51+5:302017-12-08T16:01:51+5:30

भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया लग्ना-रिसेप्शन हनीमुन उरकून गोव्यातून मुंबईत परतले आहेत. यावेळी या न्युली वेड कपलचा कॅमे-यात कैद ...

Did you see Bharti Singh's first photo after marriage? | लग्नानंतर भारती सिंगचा पहिला फोटो तुम्ही पाहिला का?

लग्नानंतर भारती सिंगचा पहिला फोटो तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
रती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया लग्ना-रिसेप्शन हनीमुन उरकून गोव्यातून मुंबईत परतले आहेत. यावेळी या न्युली वेड कपलचा कॅमे-यात कैद झालेला हा फोटो आहे.फोटोत पती हर्ष लिंबाचियासह भारती खूप खुश दिसत असून गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये भारतीने घातला होता. गळ्यात मंगळसूत्र, हातात लाल बांगड्या आणि भांगात सिंदूर असलेल्या लूकमध्ये भारतीच्या सौदर्याला चार चाँद लागल्याचे पाहायला मिळत आहे. भारती सिंगच्या लग्नाचे विविध फंक्शन 6 दिवस सुरु होते. यामध्ये बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमापासून माता की चौकी, हळदी, पूल पार्टी, मेहंदी, कॉकटेल पार्टी, लग्न आणि रिसेप्शन असे विविध समारोहांचा समावेश होता. या सर्व फंक्शनमध्ये भारती आणि हर्षचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सहभागी झाले होते. सर्वांनी भारतीचे लग्न खूप एंजॉय केले.गोव्याहुन मुंबईला आल्यानंतर भारतीचे मोठ्या थाटात गृहप्रवेश करण्यात आला.पारंपारिक पद्धतीने भारतीचा गृहप्रवेश करण्यात आला.भारतीच्या रूपात सुन नाही तर मुलीचे घरात आगमन झाल्याचे हर्षच्या कुटुंबियांनी सांगितले.सासरी आलेल्या भारतीचे हर्षच्या फॅमिलीने स्वागत केले. घराच्या दारात भारती-हर्ष यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर भारतीने धान्याने भरलेला कलश ओलांडले आणि घरात प्रवेश केला. भारतीने गृहप्रवेशाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.भारतीच्या गृहप्रवेशचा व्हिडीओलाही खूप सारे कमेंटस आणि लाईक्स मिळत आहे. भारतीच्या सर्वच फोटोंवर शुभेच्छाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Also Read:भारती सिंगने शेअर केले हनीमुनचे फोटो,या ठिकाणी करतायेत Enjoy

भारती आणि हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.त्या दोघांची ओळख एका रिअॅलिटी शोच्या दरम्यानच झाली होती.हर्ष हा लेखक असून तो देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडला.टीव्ही सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात मच अवेटेड वेडिंग म्हणून भारती आणि हर्षच्या शुभमंगल सोहळ्याकडे पाहिले जात होते.त्यामुळे त्यांच्या लग्नाआधी बरीच चर्चा झाली.त्यांच्या कपड्यांपासून,संगीत सोहळा ते थेट लग्नापर्यंत त्यांच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती.त्यामुळेच आता त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या हनीमुनचीही चर्चा होणारच.सध्या गोव्यातली धम्माल मस्ती हर्षने कॅमे-यात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Web Title: Did you see Bharti Singh's first photo after marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.