चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2017 08:37 AM2017-07-17T08:37:55+5:302017-07-17T14:07:55+5:30

चाहूल या मालिकेतील निर्मलाची व्यक्तिरेखा साकारणारी शाश्वती पिंपळीकर सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...

Did you see the Fame Shashwati Pumpalikar tattoo? | चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?

चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
हूल या मालिकेतील निर्मलाची व्यक्तिरेखा साकारणारी शाश्वती पिंपळीकर सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. चाहूल ही डेली सोप असल्याने शाश्वतीचा जास्तीत जास्त वेळ हा मालिकेच्या चित्रीकरणातच जातो. पण त्यातूनही वेळ काढून तिने नुकताच एक टॅटू काढला आहे.
शाश्वतीच्या या नव्या टॅटूची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या टॅटूमध्ये काही पक्षी दिसत असून बी युअरसेल्फ असे देखील लिहिलेले आहे. या टॅटूमागे एक अर्थदेखील दडलेला आहे. या टॅटूविषयी शाश्वती सांगते, मला खूप दिवसांपासून टॅटू काढण्याची इच्छा होती. पण मला वेळच मिळत नव्हता. चित्रीकरणातून वेळ काढून मी आता माझी ही इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या हातावर मी हा टॅटू काढला असून त्यामागे एक अर्थ दडलेला आहे. या टॅटूच्या डिझाइनमध्ये एक भली मोठी रेष दिसत असून त्यामागे एक कारण आहे. या रेषेप्रमाणे आपले आयुष्य असले पाहिजे असे मला वाटते. कारण आपल्या आयुष्यात तुम्ही सतत पुढे जात राहीले पाहिजे. कितीही संकंटं आली तरी त्यातून हार न मानता पुढे गेले पाहिजे. तसेच यात काही पक्षी आहेत. मला स्वतःला उडायला खूप आवडते. एका मुक्त पक्षाप्रमाणे उडले पाहिजे आणि आपली प्रगती केली पाहिजे असे मला नेहमी वाटत असल्याने मी मी यात पक्षी काढण्याचे ठरवले तर बी युअरसेल्फ म्हणजे कोणाचेही अनुकरण करण्यापेक्षा जसे आहोत तसेच आयुष्य जगावे असे माझे मत आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा विचार करून मी हा टॅटू काढला आहे. 
 
Also Read : ​चाहूल मालिकेमध्ये निर्मला होणार भोसले वाड्यामध्ये बंदिस्त

Web Title: Did you see the Fame Shashwati Pumpalikar tattoo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.