कसौटी जिंदगी की 2 या मालिकेचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:39 PM2018-09-03T12:39:02+5:302018-09-03T13:55:24+5:30
कसौटी जिंदगी की या मालिकेचा ट्रेलर एकताने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला असून त्यासोबत पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्यांची ओळख रोमान्सचा बादशहा शाहरुख खान करून देत आहे.
श्वेता तिवारी आणि सीजान खान यांची मुख्य भूमिका असलेली कसौटी जिंदगी की ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा ट्रेलर एकताने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना नवे अनुराग आणि प्रेरणा पाहायला मिळत आहेत. या ट्रेलरमध्ये देखील अनुराग आणि प्रेरणाच्या डोक्यावर आपल्याला लाल रंगाची ओढणी दिसत आहे. ही ओढणी पाहून आपल्याला पहिल्या सिझनची नक्कीच आठवण येत आहे. या मालिकेतील कलाकार बदलले असले तरी व्यक्तिरेखांची नावे तीच आहेत. या ट्रेलरमध्ये रोमान्सचा बादशहा शाहरुख खान अनुराग, प्रेरणाच्या प्रेमकथेविषयी सांगताना आपल्याला दिसत आहेत. या ट्रेलरमध्ये अनुराग आणि प्रेरणा यांची तुलना आकाश आणि जमिनीशी केली गेली आहे. ज्याप्रमाणे आकाश आणि जमीन एकमेकांना भेटत नाहीत. त्याचप्रमाणे अनुराग आणि प्रेरणा एकमेकांना भेटू शकत नाहीत.
तसेच कसौटी जिंदगी की या मालिकेच्या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळत आहे की, कधी तुम्ही रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का, या दोघांमध्ये एक खास नाते असते... अनेक किलोमीटर ते एकत्र चालतात... पण तरीही ते एकत्र येत नाहीत. अनुराग आणि प्रेरणाची प्रेमकथा देखील काहीशी अशीच आहे. एक जमीन तर दुसरा आकाश आहे. अनेक वर्षं ते एकमेकांसोबत असले तरी त्यांच्यात दुरावा हा कायम आहे. अनुराग आणि प्रेरणा यांची प्रेमकथा किती परीक्षा देणार हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
कसौटी जिंदगी की या मालिकेचा ट्रेलर एकताने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला असून त्यासोबत पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्यांची ओळख रोमान्सचा बादशहा शाहरुख खान करून देत आहे.
कसौटी जिंदगी या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांना 25 सप्टेंबरपासून शुक्रवारी रात्री आठ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.