'मन धागा धागा जोडतो नवा'मधील आनंदीच्या प्रियकराला पाहिलंत का?, ४ वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 11:55 AM2024-06-22T11:55:57+5:302024-06-22T11:56:16+5:30

Divya Pugaonkar : दिव्या पुगावकर अक्षय घरतसोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. नुकतेच त्यांच्या नात्याला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

Did you see 'Man Dhaaga Dhaaga Jodato Nava' fame Anandi's boyfriend ? They have been in a relationship for 4 years | 'मन धागा धागा जोडतो नवा'मधील आनंदीच्या प्रियकराला पाहिलंत का?, ४ वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये

'मन धागा धागा जोडतो नवा'मधील आनंदीच्या प्रियकराला पाहिलंत का?, ४ वर्षांपासून आहेत रिलेशनशीपमध्ये

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava). या मालिकेतील आनंदी आणि सार्थकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) हिने साकारली आहे. दिव्या सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते. तसेच पोस्टमधून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने प्रियकरासोबतचा व्हिडीओ शेअर करत नात्याला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

दिव्या पुगावकर अक्षय घरतसोबत गेल्या ४ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. नुकतेच त्यांच्या नात्याला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, आनंदी प्रेमाचे ४ वर्ष.  या सर्व खास आठवणी तुझ्यासोबत शेअर करताना मी खूप आभारी आहे.. अजून खूप काही...

तर अक्षय घरतने देखील सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंचा कोलाज व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जीवनात तुम्ही कुठे जातापेक्षा तुम्ही कोणासोबत प्रवास करता ते महत्त्वाचे आहे. चार वर्षे, ४८ महिने, २०८ आठवडे ६ दिवस आणि सर्व मिळून १४६२ दिवस … आपण कितीही मोजले तरी ते सर्व प्रेमात भर घालते. धन्यवाद दिव्या पुगावकर माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे दिवसेंदिवस मजबूत होत जाईल.

काय करतो तिचा प्रियकर?
अक्षय घरत फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या खूप आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. यातूनच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 

वर्कफ्रंट
दिव्याने मुलगी झाली हो या मालिकेच्या आधी प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. मुलगी झाली हो या मालिकेतून तिला पहिल्यांदा माऊची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. तिने साकारलेल्या माऊच्या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे.
 

Web Title: Did you see 'Man Dhaaga Dhaaga Jodato Nava' fame Anandi's boyfriend ? They have been in a relationship for 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.