कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा नवा टॅटू तुम्ही पाहिला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:16 PM2018-07-09T13:16:29+5:302018-07-09T18:28:48+5:30
अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'तू तिथे मी', 'अस्मिता', 'फू बाई फू' अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.
कलाकारांचे टॅटूप्रेम हे जगजाहीर आहे... कधी आपल्या मानेवर तर कधी मानेवर तर कधी हाताच्या मनगटावर टॅटू गोंदल्याचे फोटो आपण पाहतो. अगदी तशीच टॅटूची क्रेझ चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुदडेलाही आहे. श्रेया बुगडेने देखील नुकताच एक नवा टॅटू बनवला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू इक्विलिब्रियम म्हणजेच समतोल दर्शवतो. श्रेया बुगडे तिच्या टॅटूच्या अत्यंत प्रेमात असल्याचं दिसून येत आहे. तिने तिच्या नवीन टॅटूचे फोटोज तिच्या चाहत्यांसोबत तिच्या सोशल मीडियावर शेअर करत या फोटोला तिने कॅप्शन देत म्हटले आहे की, 'बिकॉज एव्हरीथिंग इन लाईफ इज अबाऊट बॅलन्स!'. श्रेयाचा हा नवा टॅटू तिच्या इतकाच तिच्या चाहत्यांना देखील आवडतोय हे तिच्या फोटोला मिळालेल्या प्रतिसादावरून कळतंय. श्रेयाने या आधी देखील एक टॅटू केलेला होता ज्यात तिला तिच्या मानेवर 'दुर्गा माँ' गोदवले होते.
'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'तू तिथे मी', 'अस्मिता', 'फू बाई फू' अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.