'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील समीरच्या सख्या भावाला पाहिलंत का ? तो ही आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:12 PM2022-01-25T17:12:27+5:302022-01-25T18:22:13+5:30

'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade)  साकरतोय.

Did you see Sankarshan karhade's brother'? He is an actor | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील समीरच्या सख्या भावाला पाहिलंत का ? तो ही आहे अभिनेता

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील समीरच्या सख्या भावाला पाहिलंत का ? तो ही आहे अभिनेता

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका रसिकांना चांगलीच भावली आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत.  या मालिकेत  समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade)  साकरतोय. संकर्षण साकारत असलेली समीरची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे. समीर आणि यशची मैत्रीदेखील प्रेक्षकांना भवतेय. पण तुम्हाला माहिती आहे का संकर्षण प्रमाणेच त्याचा भाऊ देखील अधोक्षज कऱ्हाडे सुद्धा अभिनेता आहे. लवकरच तो नव्या मालिकेत दिसणार आहे.  

अधोक्षज कऱ्हाडेने  (adhokshaj karhade ) सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबाबात माहिती दिली आहे. स्टार प्रवाहवरील पिंकीच विजय असो  (pinkicha vijay asoo)  या मालिकेत अधोक्षज बंटीची हटके भूमिका निभावताना दिसणार आहे. येत्या 31 जानेवारी 2022पासून रात्री 11 .00वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अधोक्षज कऱ्हाडेने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, जसा पेहराव,भूमिकापण अगदी तशीच!एकदम कलरफुल्ल 🌈"बंटी".नवीन मालिका,नवीन भूमिका,नवं आव्हान!"पिंकीचा विजय असो!"

 अधोक्षज कऱ्हाडेसु्द्धा लहानपणापासून नाटकांमध्ये काम करत आहे. अधोक्षजने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो झीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत दिसला होता. शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे, या लघुपटात देखील तो दिसला आहे. आता तो पिंकीचा विजय असो या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याच्यासोबत  अमिता खोपकर, पियुष रानडे, हर्षद नायबळ,  अंकिता जोशी, कल्याणी जाधव, मुकेश जाधव, सुनील तावडेमुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

 

Web Title: Did you see Sankarshan karhade's brother'? He is an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.