​भाभीजी घर पर है या मालिकेतील आसिफ शेखचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 10:10 AM2017-12-14T10:10:23+5:302017-12-14T15:40:23+5:30

भाभीजी घर पर है ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी ...

Did you see that the sister-in-law is at home, the new look of Asif Shaikh in the series? | ​भाभीजी घर पर है या मालिकेतील आसिफ शेखचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

​भाभीजी घर पर है या मालिकेतील आसिफ शेखचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

googlenewsNext
भीजी घर पर है ही मालिका सुरू झाल्यापासूनच ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील विभूती, अंगूरी भाभी, अनिता या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत आशिफ शेख प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतो. कथानकांच्या मागणीनुसार तो वेगवेगळी रूपे धारण करत असतो. कधी तो रेडिओ जॉकी बनतो तर कधी लाँड्रीमॅन तर कधी पगडी घातलेला पंजाबी. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तो आता मालिकेत स्त्रीच्या वेशात दिसणार आहे. तो या मालिकेत नर्सच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. 
भाभीजी घर पर है या मालिकेच्या पुढील भागामध्ये अंगुरी भाभीचा एक अपघात होणार असून तिची स्मरणशक्ती जाणार आहे. अंगुरी कोणालाच ओळखणार नाहीये. विभूतीला देखील ओळखण्यास ती नकार देणार आहे. विभूती हा कुलभुषण असल्याचे तिला वाटणार आहे आणि या कुलभूषणचा ती प्रचंड तिरस्कार करते. त्यामुळे ती विभूतीला तिच्या नजरे समोर देखील उभी करणार नाहीये. त्यामुळे अंगुरीची स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी विभूती प्रचंड प्रयत्न करणार आहे. पण प्रयत्न करून देखील अंगूरीची स्मरणशक्ती येत नाही हे कळल्यावर विभूती एक नवे रूप धारण करणार आहे. अंगूरीसोबत आपण सतत राहिल्यास तिची स्मरणशक्ती आपण परत आणू शकतो असा त्याला विश्वास असल्याने तो नर्सचे रूप धारण करणार आहे. नर्सच्या या लूकसाठी विभूतीची भूमिका साकारणारा आशिफ शेख सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडावी यासाठी त्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. याविषयी आशिफ सांगतो, पुढील काही भागांमध्ये प्रेक्षकांना मला नर्सच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मला या भूमिकेसाठी मेकअप करायला जवळजवळ अडीज तास लागतो. मी आजपर्यंत पन्नास वेळा तरी स्त्रीचा वेश धारण केला असेल असे मला वाटते. स्त्रीचा मेकअप करणे हे खरेच सोपे नाहीये. स्त्रियांना आवरायला वेळ का लागतो हे मला आता चांगलेच कळले आहे. या सगळ्यातून माझा स्त्रियांविषयी असलेला आदर आणखीनच वाढला आहे. 

Also Read : 'भाभीजी घर पर है' मालिकेत 'मुघल-ए-आझम'चा रिमेक

Web Title: Did you see that the sister-in-law is at home, the new look of Asif Shaikh in the series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.