यशच्या रिअल लाईफमधील छोट्या परीला पाहिलंत का?, क्युटनेसमध्ये स्टारकिड्सना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:00 AM2022-02-08T07:00:00+5:302022-02-08T15:28:50+5:30

तुम्ही यश म्हणजेच श्रेयस तळपदेच्या खऱ्या आयुष्यातील परी पाहिलंत का ?

did you seen the shreyas talpade's real life daughter | यशच्या रिअल लाईफमधील छोट्या परीला पाहिलंत का?, क्युटनेसमध्ये स्टारकिड्सना देते टक्कर

यशच्या रिअल लाईफमधील छोट्या परीला पाहिलंत का?, क्युटनेसमध्ये स्टारकिड्सना देते टक्कर

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath)ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली.मालिकेचा वेगळा विषय रसिकांच्या मनाला भुरळ घालत आहे. उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे,श्रेयस तळपदे हे मुख्य भूमिकेत असून मायरा वायकुळ ही चिमुकली बालकलाकाराची भूमिका साकारत आहे. परी आणि तिचा फ्रेंड यशमध्ये असलेले बॉन्डिंग ही प्रेक्षकांना खूप आवडते आहे. पण तुम्ही यश म्हणजेच श्रेयस तळपदेच्या खऱ्या आयुष्यातील परी पाहिलंत का ?

श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. बऱ्याचदा तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. तो अनेक वेळेला आपल्या पत्नी दिप्ती आणि मुलीसोबतचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. श्रेयसच्या खऱ्या आयुष्यातील परीचं नाव आद्या आहे.

आद्या दिसायला खूप खूपच क्युट आहे. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये श्रेयसमध्ये दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळत आहे. श्रेयस आद्यासोबत नेहमी क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतो. 

श्रेयसबाबत बोलायचे झाले तर मराठी चित्रपटसृष्टीद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली असली तरी त्याने आज हिंदीत देखील त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये श्रेयसने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहे. लवकर श्रेयस मुक्ता बर्वोसोबत ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: did you seen the shreyas talpade's real life daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.