युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:16 IST2025-01-31T12:15:12+5:302025-01-31T12:16:07+5:30
धनश्रीसोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर युजवेंद्र चहलचं नाव एका RJ सोबत जोडलं गेलं होतं. आता त्याने अभिनेत्री झारा यास्मीन हिला प्रपोज केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..."
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. युजवेंद्र चहल आणि धनश्री घटस्फोट घेत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर युजवेंद्र चहलचं नाव एका RJ सोबत जोडलं गेलं होतं. आता त्याने अभिनेत्री झारा यास्मीन हिला प्रपोज केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
चहलने यास्मीनला प्रपोज केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता अभिनेत्री झारा यास्मीन हिने प्रतिक्रिया दिली आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये झाराने नेमकं काय झालं होतं ते सांगितलं. करोनादरम्यान युजवेंद्र चहल आणि झारा यास्मीन यांनी मिळून एक लाइव्ह सेशन घेतलं होतं. यामध्ये Covid 19 पासून कसं संरक्षण कराल, याबाबत त्यांनी चाहत्यांसोबत संवाद साधला होता. तेव्हा लाइव्ह सेशनदरम्यानच चहलने झाराला प्रपोज केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता अभिनेत्रीने मौन सोडत "मी आणि युजवेंद्र चहल फक्त मित्र आहोत", असं म्हटलं आहे.
झाराने सांगितलं की असं काहीच घडलं नव्हतं. या अफवेमुळे तिला ट्रोल केलं गेलं होतं. तर लाइव्ह सेशननंतर काही दिवसांतच युजवेंद्र चहलचं लग्न झालं होतं. झारा यास्मिनने हे स्पष्ट केलं की या केवळ अफवा असून तयार केलेली कहाणी होती. झारा यास्मिन एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील आहे. 'सब की बारातें आई' या गाण्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.