वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम 'स्पर्श वात्सल्याचा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 05:31 PM2018-08-02T17:31:46+5:302018-08-02T17:32:34+5:30

नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात स्पर्शवात्सल्याचा हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे.

A different program 'Sparsh Vastalyacha' | वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम 'स्पर्श वात्सल्याचा'

वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम 'स्पर्श वात्सल्याचा'

googlenewsNext
ठळक मुद्दे 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

झी युवा वाहिनीने कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आता या वाहिनीवर रंजक पण भावनिक विषयावर आधारीत 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पहिले बाळ जन्माला आल्यावर आयुष्याच्या चित्रात नव्याने रंग भरले जातात. जीवनाच्या कॅनव्हासवर अनुभवांच्या रेषा रेखाटत आई बाबा आपल्या बाळाचे संगोपन करतात आणि ते संगोपन करताना आजी आजोबांची सोबत असतेच. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने व जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात स्पर्शवात्सल्याचा हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे. कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलाशी जोडल्या गेलेल्या भावना या कार्यक्रमातून प्रेक्षकांसाठी सादर केल्या जाणार आहे. कार्यक्रमाचे निवेदक मुंबईतील अनेकघरांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वयस्कर व्यक्तींशी, नातेवाईकांशी आणि प्रथमच नवीन पालक बनलेल्यांशी संवाद साधणार आहेत. ८ महिने ते दीड वर्षांची मुले असलेल्या पालकांची मुलांची काळजी घेण्याची संकल्पना सुधारण्याचे ध्येय असलेल्या या कार्यक्रमामध्ये कुटुंबासोबत मजेदार गप्पांचासुद्धा समावेश आहे. त्यांच्या लहानग्यांची काळजी घेण्याविषयीचे गंमतीदार आणि भावनाशील अनुभव स्पर्श वात्सल्याचा मधून पालक सांगू शकणार आहेत. परस्परसंवाद साधत असतानाच, निवेदक पालक आणि आजीआजोबांना काही गंमतीदार खेळ खेळायला लावणार आहे आणि त्यातून कार्यक्रमाची रंजकता वाढणार आहे. वेगळ्या धाटणीचा 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम झी युवा ६ ऑगस्ट पासून संध्याकाळी ६.३०वाजता प्रसारीत होणार आहे.

Web Title: A different program 'Sparsh Vastalyacha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.