'सुपर सिस्‍टर'मधील आतापर्यंतची वेगळी भूमिका - वैशाली ठक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 03:46 PM2018-07-30T15:46:21+5:302018-07-30T15:48:49+5:30

अभिनेत्री वैशाली ठक्कर आता सोनी सब वाहिनीवरील  'सुपर सिस्टर्स' मालिकेत शिवानी नामक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

A Different Role in 'Super Sister'' - Vaishali Thakkar | 'सुपर सिस्‍टर'मधील आतापर्यंतची वेगळी भूमिका - वैशाली ठक्कर

'सुपर सिस्‍टर'मधील आतापर्यंतची वेगळी भूमिका - वैशाली ठक्कर

googlenewsNext
ठळक मुद्दे शिवानीच्या भूमिकेत दिसणार वैशाली ठक्करशिवानी ही अत्‍यंत संस्‍कारी व हुशार मुलगी आहे.

'ससुराल सिमर का' , 'ये रिश्ता क्या कहलाता है ' व 'ये वादा रहा' या मालिकेतून झळकलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर आता सोनी सब वाहिनीवरील  'सुपर सिस्टर्स' मालिकेत शिवानी नामक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंतची ही वेगळी भूमिका असल्याचे वैशालीने सांगितले.

'सुपर सिस्‍टर' ही दोन बहीणींमधील दृढ नात्‍यावर आधारीत मालिका असून दोन बहीणींमधील विरोधाभास अत्‍यंत रोमांचक असेल. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे शिवानी व अष्मित यांच्‍यामधील प्रेम प्रेक्षकांना आकर्षून घेईल आणि हेच या मालिकेला वेगळे वळण देईल, असे वैशालीने सांगितले व म्हणाली की, ' मी साकारत असलेली शिवानी ही अत्‍यंत संस्‍कारी व हुशार मुलगी आहे. ती उच्‍च शिक्षित असण्‍यासोबतच विनम्र देखील आहे. मला वाटते आपल्‍या सर्वांची, विशेषत: आई‍वडिल, दादा-दादी व नाना-नानी यांची आपल्‍या कुटुंबामध्‍ये अशी मुलगी असावी हीच इच्‍छा असेल. '
यापूर्वी साकारलेल्‍या भूमिकांपेक्षा ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. माझ्या पहिल्‍या मालिकेमध्‍ये मी आधुनिक काळातील एनआरआय मुलीची भूमिका साकारली, जी अगदी स्‍पष्‍टवादी व व्‍यावहारिक होती. माझ्या दुसऱ्या मालिकेमध्‍ये मी एका श्रीमंत नटखट मुलीची भूमिका साकारली. ही भूमिका देखील व्‍यावहारिक होती आणि तिच्‍यामध्‍ये विविध गुण सामावलेले होते. पण मी शिवानी सारखी भूमिका साकारण्‍यासाठी उत्‍सुकतेने वाट पाहत होती. म्‍हणूनच मला ही भूमिका साकारायला मिळाल्‍याने खूपच आनंद झाला आहे आणि अर्थातच ही प्रमुख भूमिका आहे. म्‍हणूनच माझा आनंद द्विगुणित झाला असल्याचे वैशाली म्हणाली.

Web Title: A Different Role in 'Super Sister'' - Vaishali Thakkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.