नवा शो, नवा होस्ट! ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा ‘आशु’ लवकरच येतोय तुमच्या भेटीला... !!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:22 PM2022-03-01T12:22:06+5:302022-03-01T12:26:24+5:30

Pushkraj Chirputkar : होय,  ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशु अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर लवकरच नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘बँड बाजा वरात’ शो तो होस्ट करणार आहे.

dil dosti duniyadari aashu aka pushkraj chirputkar host zee marathi show band baja varat | नवा शो, नवा होस्ट! ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा ‘आशु’ लवकरच येतोय तुमच्या भेटीला... !!

नवा शो, नवा होस्ट! ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा ‘आशु’ लवकरच येतोय तुमच्या भेटीला... !!

googlenewsNext

आशू, रेश्मा, कैवल्य, अ‍ॅना, सुजय आणि मीनल या सहा मित्रांची मालिका म्हणजे, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari). ही धम्माल मालिका तुफान गाजली होती. तरूणाईने तर या मालिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. मालिकेची लोकप्रियता पाहून याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता अचानक ही मालिका आठवण्याचं कारण काय तर  ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशू. होय,  ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा आशु अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर  (Pushkraj Chirputkar) लवकरच नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एक नवा कोरा शो तो होस्ट करणार आहे.

‘मराठी सिरिअल्स ऑफिशियल’ने दिलेल्या वृत्तानुसार, झी मराठीवरच्या (Zee Marathi) ‘बँड बाजा वरात’  ( Band BajaVarat या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुष्कराज करणार आहे. ‘बँड बाजा वरात’चा नवा प्रोमो रिलीज झालाये. त्यात पुष्कराजचा चेहरा दिसत नाही. पण तोच या शोचा होस्ट असल्याचं कळतंय.
पुष्कराज चिरपुटकर काही दिवसांपूर्वी ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकेत झळकला होता.  

असा आहे  ‘बँड बाजा वरात’ हा शो
नवीन वर्षात झी मराठीच्याअनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही मालिका लवकरच संपत आहे. त्यांच्या जागी नव्या मालिका येत आहेत. पण तेवढं पुरेसं नाही. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ आणि ‘देवमाणूस 2’ या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. अशात प्रेक्षकांना खिळवून ठेवायचं तर एंटरटेनमेंटचा डोस वाढवायला हवा. त्यामुळेच प्रेक्षकांचा डायरेक्ट कनेक्ट मिळवण्यासाठी झी मराठी ‘बँड बाजा वरात’ हा नवा शो घेऊन येत आहे. नुकताच या शोचा प्रोमो रिलीज झाला.

या शोची कनेस्पट काय असणार याबद्दल कोणतीच माहिती मिळालेली नाही. पण प्रोमोतील कलश पाहून तर लक्षात येत आहे की, ही मालिका लग्नाशीसंबंधीत आहे. ‘लोकमत फिल्मी’ला मिळालेल्या माहितीनुसार, झी मराठीवरचा ‘हे तर काहीच नाय’ हा शो बंद होणार असून त्याची जागा ‘बँड बाजा वरात’ हा नवा कोरा शो घेणार आहे. लग्न ठरलेल्या जोडप्यांसाठी हा शो असल्याचं कळतंय. 

Web Title: dil dosti duniyadari aashu aka pushkraj chirputkar host zee marathi show band baja varat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.