पुन्हा सुरू होणार 'दिल दोस्ती दुनियादारी', पण झी मराठीवर नाही तर 'या' चॅनेलवर दिसणार मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 02:01 PM2024-06-25T14:01:09+5:302024-06-25T14:02:58+5:30

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. ही मालिका पुन्हा प्रसारित केली जाणार आहे.

dil dosti duniyadari marathi tv serial to be re telecast on zee yuva from 1st july | पुन्हा सुरू होणार 'दिल दोस्ती दुनियादारी', पण झी मराठीवर नाही तर 'या' चॅनेलवर दिसणार मालिका

पुन्हा सुरू होणार 'दिल दोस्ती दुनियादारी', पण झी मराठीवर नाही तर 'या' चॅनेलवर दिसणार मालिका

टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांच्या पंगतीत जाऊन बसलेली आणि प्रेक्षकांच्या मनामनात घर केलेली मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती.  जवळपास १ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने निरोप घेतला होता. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुन्हा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. ही मालिका पुन्हा प्रसारित केली जाणार आहे. पूर्वी झी मराठीवर ही मालिका प्रसारित झाली होती. पण, आता झी मराठीवर नाही तर वेगळ्या चॅनेलवर या मालिकेचं प्रसारण केलं जाणार आहे. झी युवा वाहिनीवर 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. १ जुलैपासून 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेचं झी युवावर प्रसारण होणार आहे. रात्री १०.३० वाजता सोमवार ते शुक्रवार ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

पुन्हा एकदा 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका टीव्हीवर पाहता येणार असल्याने चाहतेही आनंदी आहे. या मालिकेप्रमाणेच त्याचं शीर्षक गीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. स्वानंदी टिकेकर, अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि पुष्कराज चिरपुटकर अशी मालिकेची स्टारकास्ट होती. या मालिकेने कलाकारांनाही प्रसिद्धी मिळवून दिली होती. 

Web Title: dil dosti duniyadari marathi tv serial to be re telecast on zee yuva from 1st july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.