दोन वर्षांनी भेट होऊनही नरेंद्र मोदींच्या लक्षात आली 'ती' गोष्ट, जेठालालने सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:55 PM2024-10-28T17:55:35+5:302024-10-28T17:56:12+5:30
दिलीप जोशींनी सांगितला मजेशीर किस्सा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी (Dilip Joshi) यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या भूमिकेने मालिकेला वेगळ्याच उंचीवर पोहोचवलं. दिलीप जोशींचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर केला आहे. भेटीदरम्यान पंतप्रधानांनी दिलीप जोशींना कोणता प्रश्न विचारला याचा किस्सा त्यांनी सांगितला.
दिलीप जोशी म्हणाले, "२००८ साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सुरु होताच सुपरहिट झाली. ही मालिका ज्यांच्यावर होती ते रिअल लाईफ तारक मेहता यांच्या एका पुस्तकाचं अनावरण अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासमोर तारक मेहतांवर ४५ मिनिटांचं एक नाटक आम्ही सादर करणार होतो. तेव्हा आम्ही मोदींना भेटलो." 'मोदी स्टोरी' या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले, "यानंतर २०११ मध्ये त्यांच्याशी परत भेट झाली. अहमदाबादमध्येच सद्भावना मिशन होतं. तेव्हा आम्ही एकेक करुन त्यांची भेट घेण्यासाठी स्टेजवर जात होतो. त्या दिवसांमध्ये माझं वजन कमी झालं होतं. जसं मी मोदींसमोर गेलो ते मला म्हणाले, 'जेठालाल वजन ओछु कर्यु छे (वजन कमी केलं का).' मी बघतच राहिलो. ते लाखो लोकांना रोज भेटत असतील पण त्यांना आमची दोन वर्षांपूर्वीची भेट लक्षात राहिली. माझं वजन कमी झालंय हेही त्यांच्या लक्षात आलं हे पाहून मला सुखद धक्काच बसला."