Dilip Joshi Birthday: एकेकाळी ५० रुपये कमवणारे 'जेठालाल', आज आहेत कोट्यवधीचे मालक; जाणून घ्या संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:35 AM2022-05-26T08:35:32+5:302022-05-26T08:48:22+5:30
दिलीप जोशी यांनी १९८९ मध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रात मैने प्यार किया चित्रपटातून सुरूवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते.
मुंबई - प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांचा आज २६ मे रोजी वाढदिवस आहे. दिलीप जोशी टीव्ही सिरियलमधील नावाजलेले नाव आहे. त्यांच्या कलाकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या दिलीप जोशींवर एकवेळ अशी आली होती जेव्हा त्यांना बेरोजगार राहावं लागलं होतं. परंतु आज त्यांची कमाई कोट्यवधीच्या घरात आहे. दिलीप जोशी यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आल्याचं पाहायला मिळालं.
दिलीप जोशी यांनी सिनेमातही काम केले आहे. ते अभिनेता सलमान खानसोबत मैने प्यार किया यात भूमिका निभावली आहे. परंतु कदाचित तुम्ही त्यांना ओळखलं असेल. दिलीप जोशींनी अनेक चित्रपटात काम केले परंतु त्या क्षेत्रात त्यांना फारसं यश आलं नाही. दिलीप जोशी यांना टीव्ही मालिकांमध्येही काम मिळाले. परंतु काही मोजक्याच मालिका प्रसिद्ध झाल्या. तारक मेहता शोमधून जेठालाल बनून दिलीप जोशी नावारुपाला आले. २००८ मध्ये जेव्हा तारक मेहता शो सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत दिलीप जोशी या मालिकेचा भाग आहेत.
दिलीप जोशी यांनी १९८९ मध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रात मैने प्यार किया चित्रपटातून सुरूवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांना कामाचे ५० रुपये प्रत्येक भूमिकेसाठी मिळत होते. मात्र एकदा त्यांना करिअर मध्येच सोडावं लागले. दिलीप जोशी तारक मेहता मालिका साइन करण्यापूर्वी १ वर्ष बेरोजगार होते. इतकेच नाही तर तारक मेहता मालिकेत दिलीप जोशी यांना ऑफर मिळाली तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला. कारण त्यावेळी ते इतर मालिकेत व्यस्त होते. परंतु ती सिरियल प्रॉडक्शन बंद झाले. तेव्हा दिलीप जोशी यांनी तारक मेहता शोसाठी होकार दिला. दिलीप जोशी यांना जेठालाल ऐवजी चंपकलाल भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु आपण जेठालालच्या भूमिकेला न्याय देऊ असं दिलीप जोशी यांना वाटलं. त्यांनी जेठालालसाठी ऑडिशन दिले. त्यानंतर आज त्या भूमिकेची प्रसिद्धी सगळ्यांना माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेठालाल भूमिका साकारण्यासाठी दिलीप जोशी प्रत्येक एपिसोडला दीड लाख रुपये मानधन घेतात. ते शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत. दिलीप जोशी यांची संपत्ती ४३ कोटींपर्यंत आहे.