ए हालो! दिलीप जोशीने मुलीच्या संगीत समारोहात केला जबदस्त डान्स, जेठालालचा गरब्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:59 IST2021-12-10T15:55:42+5:302021-12-10T15:59:06+5:30
जेठालालचा (Jethalal) होणारा जावई हा एनआरआए आहे.विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेचा हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

ए हालो! दिलीप जोशीने मुलीच्या संगीत समारोहात केला जबदस्त डान्स, जेठालालचा गरब्याचा व्हिडीओ व्हायरल
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak mehta ka ooltah chashmah) मध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या घरी सध्या लगीन घाई सुरु आहे, 11 डिसेंबरला त्यांची मुलगी नियतीचं लग्न होणार आहे.नियतीचं प्री-वेडिंग सेरेमनी सुरु झाली आहे. याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. सोशल मीडियावर प्री-वेडिंग सेरेमनीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी फुल मूडमध्ये दिसतायेत. मुलीच्या संगीत सेरेमनीमध्ये दिलीप जोशी यांनी जबरदस्त डान्स केला आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
जेठालला (Jethalal Dance Video) च्या एक फॅन क्लबने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिलीप जोशी ग्रीन कुर्त्यामध्ये दिसतायेत. व्हिडिओमध्ये जेठालाल ढोललाच्या तालावर नाचतायेत आणि नंतर समारंभात गाताना दिसत आहेत. मागे डीजे सुरु आहे. लग्नाला आलेला पाहुणेही यात नाचताना दिसतायेत. डान्स दरम्यान जेठालला गरबा खेळताना सुद्धा दिसतायेत. काही स्त्रिया बॅकग्राऊंडला दांडिया खेळताना दिसातायेत. मुलीच्या लग्नाचा आनंद दिलीप जोशी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.
. जेठालालचा होणारा जावई हा एनआरआए आहे.विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेचा हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. कारण हा विवाहसोहळा मुंबईतल्या आलिशान ताज हॉटेलमध्ये होणार आहे. या शाही लग्नसोहळ्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले कलाकारांची खास उपस्थिती तर असणारच आहे. शिवाय मालिका विश्वातले काही खास मित्रमंडळीदेखील या लग्नाला हजेरी लावणार आहेत. जेठालालच्या मुलीच्या लग्नात मात्र दया बेन म्हणजेच दिशा वाकानी हजेरी लावणार नसल्याचे समजतंय.