Bigg Boss 15मध्ये डिनर, डान्स आणि रोमांस...अशी परफेक्ट झाली शमिता आणि राकेशची डेट नाइट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 05:32 PM2021-11-09T17:32:04+5:302021-11-09T17:32:43+5:30
Bigg Boss 15 शमिता राकेश बापटच्या वापसीसाठी कित्येकदा विनंती केली होती. बिग बॉसने तिची विनंती मान्य केली आणि राकेश बापटला बिग बॉसच्या घरात बोलवले.
शमिता शेट्टी तिचा कथित बॉयफ्रेंड राकेश बापटलाबिग बॉस १५च्या (Bigg Boss 15) घरात खूप मिस करत होती. आता तो तिच्यासोबत आहेत. शमिता शेट्टीने राकेश बापटच्या वापसीसाठी कित्येकदा विनवणी केली होती. त्यानंतर बिग बॉसने तिची विनंती मान्य केली आणि राकेश बापटला घरी बोलवून घेतले. इतकेच नाही तर या दोघांना स्टोअरमध्ये डेट नाइटसाठी पाठवले.
स्टोअरमध्ये दोघांच्या डेट नाइटसाठी स्पेशल सेटअप तयार केला होता. दोघांनी या डेटवर खूप एन्जॉय केले. डान्ससोबत दोघांनी चविष्ट जेवणाचाही आस्वाद घेतला. आता दोघांच्या डेट नाइटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
यादरम्यान शमिता आणि राकेश एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले होते. स्टोअरमध्ये लाइट्ससोबत टेबलचे सुंदर डेकोरेशन केले होते. यासोबतच या दोघांनी डेट नाइटला सिम्पल कॅज्युअल कपडे घातले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोघांच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव होतो आहे.
बिग बॉस ओटीटीमध्ये दोघांमध्ये प्रेम फुलताना दिसले होते. जेव्हा सर्व भांडण व्हायची तेव्हा शमिता आणि बापट नेहमीच एकत्र दिसले होते. या शोदरम्यान त्या दोघांमधील जवळीकता आणखी वाढली होती. इतकेच नाही तर शमिता जेव्हा बिग बॉस १५च्या घरात आल्यानंतर बाहेरून राकेश बापट तिला सपोर्ट करताना दिसून आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे लव्हबर्ड्स एकमेकांच्या बाबतीत खूप सीरियस आहेत. शमिताची बहिण शिल्पा शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टीला देखील राकेश आवडतो.