मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार - अभिनय देव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2016 12:42 PM2016-06-27T12:42:17+5:302016-06-27T18:12:17+5:30
देल्ही बेल्ही, २४, फोर्स यांमुळे नावारूपाला आलेले दिग्दर्शक अभिनय देव सध्या २४ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनवर काम करत आहेत. ...
द ल्ही बेल्ही, २४, फोर्स यांमुळे नावारूपाला आलेले दिग्दर्शक अभिनय देव सध्या २४ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनवर काम करत आहेत. २४ या मालिकेबद्दल आणि त्यांच्या पुढील प्रोजेक्टसविषयी अभिनय यांनी सीएनएक्ससोबत साधलेला संवाद...
२४ या मालिकेच्या दुसऱया सिझनचा तुझा अनुभव कसा आहे?
या मालिकेवर गेली दीड वर्षं मी काम करत आहे. या मालिकेची पटकथा, कलाकार या सगळ्याच गोष्टी या पहिल्या सिझनपेक्षाही चांगल्या असाव्यात यासाठी सगळ्याच टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. या मालिकेचे चित्रीकरण करणे हे अतिशय अवघड होते. या मालिकेचे चित्रीकरण आम्ही अधिकाधिक रात्रीच्या वेळेत केलेले आहे. सतत चित्रीकरण सुरू असल्याने माझी तब्येतही बिघडली होती. पण तरीही आम्ही त्या अवस्थेतही चित्रीकरण केले.
२४च्या पहिल्या सिझनला म्हणावा तसा लोकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. या सिझनचा टिआरपी वाढवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात?
२४च्या पहिल्या सिझनला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळताही आम्हाला दुसरा सिझन करायला मिळत आहे यासाठी आम्ही वाहिनीचे आभारी आहोत. या दुसऱ्या सिझनमध्ये आम्ही छोट्या पडद्यावरील काही प्रसिद्ध कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांमुळे प्रेक्षक मालिकेकडे अधिक आकर्षित होईल असा मला विश्वास आहे. या मालिकेत साक्षी तन्वर प्रमुख भूमिकेत आहे. छोट्या पडद्यावर साक्षीने आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील तिची भूमिका खूप वेगळी आहे. प्रेक्षकांना तिला या वेगळ्या भूमिकेत पाहायला आवडेल अशी मला खात्री आहे.
या मालिकेत अनेक मराठी कलाकार काम करत आहे, याचे कारण काय?
रमेश देव प्रोडक्शनच्या प्रत्येक मालिकेत आम्ही मराठी कलाकारांनी संधी देण्याचा प्रयत्न करतो. २४च्या पहिल्या सिझनमध्येही अनेक मराठी कलाकार झळकले होते. तमन्ना या मालिकेतही मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर आहेत. मराठी कलाकार हे खूप चांगला अभिनय करतात. पण अनेकवेळा ते हिंदी निर्मात्यांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने त्यांना चांगल्या संधी मिळत नाहीत. त्यामुळेच आम्ही त्यांना आमच्या मालिकांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
पहिल्या सिझनमध्ये अजिंक्य देवने काम केले होते. दुसऱ्या सिझनमध्ये अजिंक्य पडद्यामागे आहे याचे कारण काय?
अजिंक्यने पहिल्या सिझनमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे अजिंक्यने मालिकेत काम करणे शक्य नव्हते. पण या दुसऱया सिझनमध्ये एक निर्माता म्हणून त्याने सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या आहेत. या सिझनमध्ये पडद्यामागचा खरा सूत्रधार हा तोच आहे.
भविष्यात कोणत्या चित्रपटांचे दिग्दर्शन तुम्ही करणार आहात?
सध्या मी फोर्स २ आणि ब्लॅकमेल या दोन चित्रपटांवर काम करत आहे. तसेच आमच्या प्रोडक्शनच्या मराठी आणि हिंदी मालिका पुढील काळात सुरू होणार आहेत. मी माझ्या कारकिर्दीत अद्याप मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. सध्या मी एका कथेवर काम करत असून लवकरच मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा माझा विचार आहे.