गरोदरपणात खूप वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय केलं? दिशा परमार म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:17 PM2024-05-31T13:17:45+5:302024-05-31T13:18:18+5:30
दिशाचं जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिशा परमार सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. गेल्यावर्षी दिशाने मुलीला जन्म दिला. प्रेग्न्सींपासून ते मुलीच्या जन्मापर्यंतचा प्रवास तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यातच तिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दिशाने डिलिव्हरीनंतर तिचे वजन कमी करण्यामागील प्रेरणादायी सीक्रेट सांगितले आहे.
दिशा परमारने प्रेग्नेंसीदरम्याने आणि नंतरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीचे प्रसूतीनंतरचे वजन कमी होताना दिसत आहे. प्रसूतीनंतर शेवटचे ४-५ किलो वजन कमी करणे खूप अवघड गेल्याचं तिनं सांगितलं. दिशाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. दिशा म्हणाली, 'गर्भधारणेदरम्यान माझे 11 किलो वजन वाढले होते. पहिले 7 किलो अगदी सहज कमी झालं होतं. पण शेवटचे 4-5 किलो वजन कमी करणे सर्वात कठीण होतं. या संपुर्ण काळात राहुल आणि माझे कुटुंब माझा सर्वात मोठा आधार राहिले. त्यामुळेच मी माझ्या बाळाची आणि माझ्या आरोग्याची काळजी घेऊ शकले'.
यावेळी दिशाने वर्कआऊटही महत्व दिलं. दिशाचं जबरदस्त असं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत. दिशा तिच्या गरोदरपणातही तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती. अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीच्या कालावधीचा खूप आनंद घेतला. दिशा आणि राहुलच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर दोघांच्या प्रेम कहाणीची सुरुवात सोशल मीडियावर एका कमेंटने झाली होती. २०२० मध्ये 'बिग बॉस १४' शोमध्ये राहुलने दिशाला प्रपोज केले होते. त्यानंतर दोघांनी १६ जुलै २०२१ रोजी लग्न केलं. या लव्हबर्ड्सनी १८ मे २०२३ रोजी सोशल मीडियावरून आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली होती.