'बिग बॉस १४' साठी 'तारक मेहता' मालिकेतील प्रसिद्ध कलाकाराला मिळाली ऑफर, तगडी रक्कम देण्याचीही आहे तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:35 PM2020-08-29T19:35:59+5:302020-08-29T19:40:43+5:30
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे.तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करणार आहे.
सध्या छोट्या पडद्यावर बिग बॉसच्या १४ व्या सीझनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या शोचे प्रोमोसुद्धा झळकण्यास सुरुवात झाली आहे. दिवसागणिक या शोच्या आगामी सीझनबाबत आणि सहभागी स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम काय असणार याची प्रचंड उत्सुकता आहे.यंदाच्या १२व्या सीझनमध्ये दया बेन म्हणजेच दिशा वाकानीला स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे.
यासाठी मेकर्सने तिला तगडे मानधनही ऑफर केल्याचे माहिती समोर येत आहे. यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक मानधन ऑफर करण्यात आलेली दिशा वाकानी असल्याचेही चर्चा आहे.दिशा वाकानीकडून याविषयी अद्यापतरी उत्तर देण्यात आलेले नसल्याचेही समजतंय. अनलॉकनंतर 'तारक मेहता'च्या नवीन भागांचे प्रसारण पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे. पण शोचे नवीन भाग पाहिल्यानंतर दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीने परत यावे अशी रसिकांचीही इच्छा आहे.
(Also Read: Bigg Boss 14: 'नागिन 4'नंतर निया शर्माची होणार बिग बॉसच्या घरात एंट्री!)
30 नोव्हेंबर 2017 रोजी दिशाने तिच्या मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दिशाने शोच्या निर्मात्यांकडे तिने मागितली होती. तेव्हापासून दिशा शोमध्ये दिसली नव्हती. त्यानंतर शोमध्ये ती पुन्हा एंट्री करणार असल्याची माहिती समोर आली होती. म्हणून दिशाच्या जागी कोणत्याही दुस-या अभिनेत्रीलाही कास्ट करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत रसिक अजूनही मालिकेत दया परतणार अशी आशा बाळगून आहेत.तुर्तास दिशा 'बिग बॉस १४' मध्ये झळकणार की 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सलमान खान हा या निमित्ताने सर्वाधिक मानधन घेणारा छोट्या पडद्यावरचा कलाकार ठरला आहे.तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेऊन. बिग बॉससाठी सलमान आठवड्यातून एकदा शूट करणार आहे.12 आठवड्यांसाठी सलमानला 250 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आठवड्याला 20 कोटी 50 लाख रूपये. म्हणजे एका एपिसोडचे 10 कोटी 25 लाख रुपये इतकं हे मानधन त्याला देण्यात येणार आहे.