दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा'ला १ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:56 PM2024-05-08T19:56:52+5:302024-05-08T19:58:20+5:30

सध्या अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत पाहायला मिळते आहे. ती या मालिकेत आनंदीची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

Divya Pugaonkar's 'Mann Dhaaga Dhaaga Jodete Nava' completed 1 year, the actress shared a post | दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा'ला १ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

दिव्या पुगावकरच्या 'मन धागा धागा जोडते नवा'ला १ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट


'मुलगी झाली हो' मालिकेतून माऊच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) हिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. सध्या ती मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळते आहे. ती या मालिकेत आनंदीची भूमिका साकारते आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. दरम्यान आता दिव्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मन धागा धागा जोडते नवा मालिकेला एक वर्ष झाल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ओ सजनी रे…. मला आनंदी होऊन एक वर्ष झाले आहे आणि हे सर्वांसोबत शेअर करताना मी आत्ता खूप भारावून गेले आहे. मला सतत पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझे पात्र उजळून टाकल्याबद्दल धन्यवाद.

वर्कफ्रंट
दिव्या पुगावकर हिने 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेआधी  मुलगी झाली हो, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता तिची मालिका 'मन धागा धागा जोडते नवा'लादेखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

Web Title: Divya Pugaonkar's 'Mann Dhaaga Dhaaga Jodete Nava' completed 1 year, the actress shared a post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.