तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिव्यांका दिसणार दयाच्या भूमिकेत? तिनेच सांगितले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 01:39 PM2021-06-28T13:39:42+5:302021-06-28T13:41:12+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली होती.

Divyanka Tripathi to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashma? | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिव्यांका दिसणार दयाच्या भूमिकेत? तिनेच सांगितले...

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिव्यांका दिसणार दयाच्या भूमिकेत? तिनेच सांगितले...

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रेक्षक त्यांच्या लाडक्या दयाला मिस करत असून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत पुन्हा कधी पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील दया ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दया या भूमिकेत आपल्याला दिशा वाकानीला पाहायला मिळाले होते. पण गेल्या तीन वर्षांपासून ती या मालिकेचा भाग नाहीये. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या दयाला मिस करत असून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत पुन्हा कधी पाहायला मिळणार याची त्यांना उत्सुकता लागली आहे.


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली होती. पण दिव्यांका या मालिकेचा भाग नसणार असल्याचे तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान स्पष्ट केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकाला विचारण्यात आले की, दयाबेनची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर दिव्यांकाने सांगितले, “हा एक खूपच मस्त शो आहे. या शोचे अनेक चाहते आहेत. मात्र मला नाही वाटत मी हा शो करण्यासाठी मी फारशी उत्सुक आहे. 

दिव्यांकाच्या या उत्तरामुळे आता दयाच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Web Title: Divyanka Tripathi to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashma?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.