रद्दी विकून प्रसिद्ध अभिनेत्रीने घडवलं करिअर; आज आहे कोटयवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:41 PM2024-06-28T12:41:25+5:302024-06-28T12:41:54+5:30

Divyanka tripathi:आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दिव्यांकाचं नाव घेतलं जातं. दिव्यांका एका दिवसासाठी दीड लाख रुपये मानधन घेते.

divyanka-tripathi-struggle-income-fees-networth-childhood-photo-husband | रद्दी विकून प्रसिद्ध अभिनेत्रीने घडवलं करिअर; आज आहे कोटयवधींची मालकीण

रद्दी विकून प्रसिद्ध अभिनेत्रीने घडवलं करिअर; आज आहे कोटयवधींची मालकीण

 छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे आज त्या घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. सुरुवातीच्या काळात दिव्यांकाला बराच स्ट्रगल करावा लागला. एक काळ असा होता जेव्हा दिव्यांकाने चक्क रद्दी विकायचं काम केलं.

'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेतून दिव्यांका प्रकाशझोतात आली. त्यानंतर 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेतून ती प्रचंड लोकप्रिय झाली. आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये दिव्यांकाचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिला प्रचंड मेहनत आणि कष्ट करावे लागले.

रद्दी विकून चालवला घरखर्च

आज इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दिव्यांकाचं नाव घेतलं जातं. दिव्यांका एका दिवसासाठी दीड लाख रुपये मानधन घेते. त्यामुळे ती आज कोटयवधींची मालकीन आहे. परंतु, सुरुवातीच्या काळात दिव्यांकाच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्यामुळे कुटुंबाला हातभार लागावा यासाठी दिव्यांका रद्दी विकायचं काम करायची. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे ती इंडस्ट्रीकडे वळली.

दरम्यान, 'ये है मोहब्बतें' या मालिकेत इशिता भल्ला ही भूमिका साकारुन ती तुफान लोकप्रिय झाली. आज दिव्यांकाचं नेटवर्थ ४८ कोटी रुपये इतकं आहे. मालिकांसोबत ती ब्रँड प्रमोशन सुद्धा करते.

Web Title: divyanka-tripathi-struggle-income-fees-networth-childhood-photo-husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.