Diwali 2019 : हिंदी मालिकेतील आपल्या लाडक्या कलाकारांनी रसिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 07:15 AM2019-10-27T07:15:00+5:302019-10-27T07:15:00+5:30

दिवाळीच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Diwali 2019: Happy Diwali wishws by Hindi serial actor | Diwali 2019 : हिंदी मालिकेतील आपल्या लाडक्या कलाकारांनी रसिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2019 : हिंदी मालिकेतील आपल्या लाडक्या कलाकारांनी रसिकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

googlenewsNext


पवित्रा पुनिया (बालवीर रिटर्न्‍समधील तिम्‍नसा)


माझ्यासाठी दिवाळी सण तुम्‍हाला तुमच्‍या प्रियजनांना भेटण्‍यासाठी एकत्र येण्‍याची संधी देतो. दूर काम करत असलेला तुमचा मुलगा असो किंवा परदेशात शिक्षण घेण्‍यासाठी गेलेली तुमची मुलगी असो, सर्वजण या सणाला एकत्र येतात. मी यंदाच्‍या दिवाळीसाठी काही योजना केलेल्‍या नाहीत. मी माझी मालिका बालवीर रिटर्न्‍समध्‍ये व्‍यस्‍त आहे. पण मला मोकळा वेळ मिळाला तर मी दिल्‍लीमधील माझ्या आईवडिलांना भेटून त्‍यांच्‍यासोबत हा सण साजरा करेन. उत्‍सवाचा हंगाम असल्‍यामुळे आणि मला गोड पदार्थांची खूपच आवड असल्‍यामुळे मी दिवाळीदरम्‍यान माझी आवडती स्‍वीट डिश गुलाबजाम बनवते. यंदा देखील मी गुलाबजाम बनवणार आहे. मी आशा करते की, यंदाच्‍या दिवाळीमध्‍ये प्रत्‍येकाला त्‍यांच्‍या कुटुंबांना भेटण्‍याची आणि एकत्र दिवाळी सण साजरा करण्‍याची संधी मिळो.

हर्षद अरोरा (तेरा क्‍या होगा आलियामधील आलोक)


दिवाळी सण सर्वत्र आनंद व समृद्धता पसरवण्‍याबाबत आहे. मी सामान्‍यत: मुंबईमध्‍ये माझ्या मित्रांसोबत हा सण साजरा करतो, कारण माझे कुटुंब दिल्‍लीमध्‍ये राहते. मी आणि माझे मित्र दिवाळीच्‍या दिवशी पूजा करतो आणि त्‍यानंतर धमाल पार्टी करतो. यंदा मी माझ्या कुटुंबापासून दूर
असल्‍यामुळे त्‍यांच्‍यासाठी ऑनलाइन काही छान कपडे खरेदी केले आहेत. मला मिठाई खूप आवडते. त्‍यामुळे मी दिवाळीदरम्‍यान खूपच उत्‍साहित असतो. मला कोणत्‍याही मिठाईचा आस्‍वाद घ्‍यायला आवडते, पण मला खासकरून मूगडाळ बर्फी आणि मिल्‍कशेक खूप आवडतात. मी कोणत्‍याही
सणादरम्‍यान यांचा आस्‍वाद घेतल्‍याशिवाय राहवत नाही. माझ्याकडून सर्वांना स्‍वादिष्‍ट मिठाई आणि समृद्धतेने भरलेल्‍या दिवाळीच्‍या आनंदमय शुभेच्‍छा.

परेश गनात्रा (भाखरवडीमधील महेंद्र)


माझा कुटुंबासोबत प्रत्‍येक सण किंवा खास प्रसंग साजरा करण्‍यावर विश्‍वास आहे. दिवाळी सण देखील माझ्यासाठी तितकाच खास आहे. या सणादरम्‍यान प्रत्‍येकाला वेळ मिळतो आणि मला वाटते की, दिवाळी हा कुटुंबासोबत वेळ व्‍यतित करण्‍याचा खास सण आहे. दिवाळी सणाची खासियत म्‍हणजे विविध
प्रकारच्‍या मिठायांचा आस्‍वाद घ्‍यायला मिळतो. यंदा सर्वांना दिवाळीच्‍या आनंदमय शुभेच्‍छा देण्‍यासोबतच मी एक संदेश देऊ इच्छितो. सर्वांना माझा संदेश आहे की, यंदाच्‍या दिवाळीला गरजूंसाठी आनंदी बनवा. फटाके किंवा कपडे खरेदी करण्‍यावर भरपूर पैसा खर्च करण्‍यापेक्षा आपण काही मुलांना त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार आनंदाने दिवाळी सण साजरा करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो.

आसिया काजी (तेनाली रामामधील शारदा)


माझ्यासाठी दिवाळी म्‍हणजे मित्रांना भेटणे. मी माझ्या नेहमीच्‍या कामकाजामुळे त्‍यांना भेटू शकत नाही. मी कामाला जाते, त्‍यानंतर घरी येऊन झोपते. दिवाळीला ते त्‍यांच्‍या घरी पार्टींसाठी बोलवतात आणि यंदा देखील माझी तीच योजना आहे. दिवाळीमध्‍ये आकर्षक भारतीय पोशाख परिधान करायला मिळतो,
जे मला खूप आवडते. माझी आई पोशाख डिझाइन करते आणि दिवाळीदरम्‍यान मी तिनेच डिझाइन केलेले सुंदर पोशाख परिधान करते. मला मिठाई फारशी आवडत नसली तरी उत्‍सवी हंगाम असल्‍यामुळे मी मिल्‍कशेकचा आस्‍वाद घेते आणि ते मी माझ्या घरीच बनवते.

देव जोशी (बालवीर रिटर्न्‍समधील बालवीर)


दिवाळी हा दिव्‍यांचा व आनंदाचा सण आहे. हिंदू संस्‍कृतीप्रमाणे हे नवीन वर्ष देखील आहे, जे जीवनामध्‍ये आनंद घेऊन येते. दिवाळी हा केवळ एक दिवसाचा सण नाही. तो १० दिवस साजरा केला जातो. ज्‍यामध्‍ये घराची साफसफाई, सजावट, गोवर्धन पूजा आणि प्रत्‍येक संस्‍कृतीमधील अनेक प्रथा यांचा समावेश असतो. आमचे कुटुंब या उत्‍सवादरम्‍यान एकत्र येते आणि आम्‍ही आमच्‍या नातेवाईकांना देखील भेटतो. मला दिवाळीसाठी सुंदर पोशाख परिधान करायला आवडते. आम्‍ही सुंदर दिवे व रोषणाईसह आमच्‍या घराची सजावट करतो. दिवाळीदरम्‍यान आम्‍ही आवर्जून मिठाईचा भरपूर आस्‍वाद
घेतो. माझी आवडती मिठाई अहमदाबादमधील मोहन-थाल आहे. यंदा दिवाळीसाठी मी माझ्या आईवडिलांना येथे आणणार आहे. मी आशा करतो की, प्रत्‍येकाला त्‍यांच्‍या प्रियजनांसोबत हा सण साजरा करायला मिळेल.

Web Title: Diwali 2019: Happy Diwali wishws by Hindi serial actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.