'दिया और बाती हम' फेम दीपिका सिंग झाली Oops Momentची शिकार, शॉर्ट ड्रेस ठरला डोकेदुखी; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 11:07 IST2021-04-09T11:06:29+5:302021-04-09T11:07:00+5:30
दीपिका सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये ती उप्स मोमेंटला बळी पडली असल्याची दिसून येत आहे.

'दिया और बाती हम' फेम दीपिका सिंग झाली Oops Momentची शिकार, शॉर्ट ड्रेस ठरला डोकेदुखी; व्हिडीओ व्हायरल
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंग सध्या भलेही सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. दीपिका नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे.
दीपिका सिंग हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती 'बन के तीतली' गाण्यावर नाचत आहे. या व्हिडीओमध्ये ती उप्स मोमेंटला बळी पडली असल्याची दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका यलो कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका जेव्हा नाचत असते तेव्हा तिचा स्कर्ट हवेने उडतो आणि ती लगेचच हाताने तो खाली करते.
दीपिका सिंगचे एकीकडे काही चाहते डान्सचे कौतूक करत आहेत तर दुसरीकडे तिला ट्रोल करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतो आहे.
दीपिका आणि रोहित यांचे लग्न २०१४ मध्ये धुमधडाक्यात झाले होते. रोहित हा तिच्या दिया और बाती हम या मालिकेचा दिग्दर्शक होता. या दोघांची या मालिकेच्या सेटवरच ओळख झाली होती आणि ते प्रेमात पडले होते. मालिकेच्या सेटवर रोहित हा प्रियकर नसून केवळ माझा दिग्दर्शक असायचा असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. दीपिकाला एक दोन वर्षांचा मुलगा आहे ज्याचे नाव सोहम आहे.