'चंद्रकांता' मालिकेसाठी शीखा स्वरूप यांच्याशी तुलना करू नका -कृतिका कामरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 08:14 AM2017-02-18T08:14:05+5:302017-02-18T13:44:05+5:30

1990 साली  दूरदर्शनवर  चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.शीखा स्वरूपने रंगवलेल्या ...

Do not compare with Shikha Swaroop for 'Chandrakanta' series - Kamika Kamra | 'चंद्रकांता' मालिकेसाठी शीखा स्वरूप यांच्याशी तुलना करू नका -कृतिका कामरा

'चंद्रकांता' मालिकेसाठी शीखा स्वरूप यांच्याशी तुलना करू नका -कृतिका कामरा

googlenewsNext
1990
साली  दूरदर्शनवर  चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.शीखा स्वरूपने रंगवलेल्या चंद्रकांताची तीच जादु पसरवण्यासाठी अभिनेत्री कृतिका कामरा सज्ज झालीय. ब-याच दिवसांपासून चंद्रकांता विषयीच्या बातम्या रसिकांच्या कानी पडत होत्या. मात्र आता  4 मार्चला ही कृतिका कामराच्या रूपात चंद्रकांता मालिका पाहता येणार आहे.  देवकीनंदन खत्री यांच्या ‘चंद्रकांता’ या विलक्षण लोकप्रिय कादंबरीवर आधारित ‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या मालिकेतील भूमिकेद्वारे प्रसिध्द अभिनेत्री कृतिका कामरा ही टीव्ही मालिकांमध्ये परतत असून त्यात ती राजकन्येची भूमिका साकारीत आहे. एका मुलाखतीत कृतिकाने म्हटले होते की, चंद्रकांता मालिकेशी  रसिकांच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा ते या नविन ढंगातील चंद्रकांता पाहतील तेव्हा नक्कीच त्यांच्या आठवणींना ऊजाळा मिळेल.मात्र शीखा स्वरूप यांनी साकारलेल्या चंद्रकांताशी मालिकेशी माझी तुलना ही रसिक करतील.मात्र मला कोणाचीच कॉपी करायची नाहीय. ज्याप्रमाणे आजही शीखा स्वरूप आजही रसिकांच्या मनात आहेत. त्याच प्रमाणे रसिकांना माझी ही भूमिका पसंतीस उतरावी याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चंद्रकांतातील भूमिका मला माझ्या पध्दतीने साकारावयाची आहे,” असे कृतिकाने म्हटले होते.

पूर्वीच्या चंद्रकांता मालिकेबद्दल माझ्या काही सुखद आठवणी होत्या म्हणून मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण राजकन्येची भूमिका ही आव्हानात्मक असल्याने मी ती स्वीकारली आहे. मी यापूर्वी कधी ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांमध्ये भूमिका केलेल्या नाहीत,” त्यामुळे ही भूमिका स्विकारणे माझ्यासाठी एक नवे आव्हान असल्याचे कृतिका  सांगितले. या भूमिकेसाठी कृतिकाला बरेच प्रशिक्षण घ्यावे लागले. “या व्यक्तिरेखेसाठी तिला काही (वैयक्तिक) बदल घडवावे लागले; कारण ही काही सामान्य मुलगी नाहीये, तर एक राजकन्या आहे. ती कशी चालेल, बोलेल आणि वागेल,या गोष्टीवर तिला विशेष लक्षकेंद्रित करावे लागले. शिवाय संवाद हे उच्च हिंदी आणि उर्दू यांचं मिश्रण असल्याने भाषेच्यावरही तिने प्रशिक्षण घेतले असून ‘चंद्रकांता’ या मालिकेत सुदेश बेरी, चंदन आनंद, अंकित अरोरा आणि अभिषेक अवस्थी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.  4 मार्चपासून ‘लाईफ ओके’ वाहिनीवर तिचे प्रसारण सुरू होणार आहे.

Also Read:'चंद्रकांता' बनलली कृतिका कामराचा टॉपलेस फोटो झाला वायरल
                   
Also Read: 
क्रितिका कामराने चंद्रकांता पाहिलेच नव्हते

Web Title: Do not compare with Shikha Swaroop for 'Chandrakanta' series - Kamika Kamra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.