Indian Idol 12 जिंकल्यानंतर पवनदीप राजनच्या संपत्तीत झाली वाढ, जाणून घ्या त्याची Net worth
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:50 PM2021-12-25T19:50:02+5:302021-12-25T19:50:48+5:30
उत्तराखंडचा राहणारा पवनदीप राजन (Pawandeep Rajan) याने 'इंडियन आयडल १२' (Indian Idol 12 )आधी एकापाठोपाठ एक रियालिटी शो केले आहेत. हे फार कमी लोकांना माहीत आहे. पवनदीपने इंडियन आयडलपूर्वीही रियलिटी शो 'वॉइस ऑफ इंडिया' हा शो जिंकला होता.
छोट्या पडद्यावरील 'इंडियन आयडल-12' (Indian Idol 12) रियालिटी शो प्रचंड चर्चेत राहिला. या शोमध्ये सहभागी होणा-या स्पर्धकांची चर्चा कायमच रंगते. शो संपल्यानंतर या स्पर्धकांची लोकप्रियता कमी होत नाही. याउलट त्यांची अधिक चर्चा रंगते. इंडियन आयडलचं विजेतेपद पटकावण्यासाठी प्रत्येकजण खटाटोप करत असतो. इंडियन आयडलची ट्रॉफी आणि पुरस्काराची रक्कम जिंकण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यंदाच्या सीझन पवनदीप राजन ( Pawandeep Rajan) आपल्या नावावर केला.
पवनदीप राजनने या शोच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पवनदीपने आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना वेड लावले असून तो लाखो तरुणींच्या दिल की धडकन बनला आहे. नेहा कक्कर-विशाल ददनानी यांचा सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल १२ जिंकून, त्याने जगभरात नाव कमावले आहे.
उत्तराखंडचा राहणारा पवनदीप राजन याने 'इंडियन आयडल १२' आधी एकापाठोपाठ एक रियालिटी शो केले आहेत. हे फार कमी लोकांना माहीत आहे. पवनदीपने इंडियन आयडलपूर्वीही रियलिटी शो 'वॉइस ऑफ इंडिया' हा शो जिंकला होता. या शोचा विजेता बनल्यानंतर पवनदीपला ट्रॉफीसोबत 50 लाख रूपये आणि एक ऑल्टो K10 कार जिंकली होती. या शोनंतर त्याचे आयुष्यच पालटले उत्तराखंडमध्ये गायक म्हणून त्या प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोने त्याला पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
तर इंडियन आयडॉलचा १२वा (Indian Idol 12 )सीझन जिंकणे त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. पवनदीप राजनला सिंगिंग रिअॅलिटी शोची ट्रॉफी आणि २५ लाख रु. आणि मारुती स्विफ्ट कार बक्षीस म्हणून भेट देण्यात आली.पवनदीप हा सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. पहिल्या परफॉर्मन्सनंतर सगळ्यातजास्त फॉलोअर्सची संख्या असलेल्या पवनदीप हा एकमेव स्पर्धक होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर पवनदीपच्या एकूण संपत्तीमध्ये मोठा बदल झाला आहे. पवनदीप राजन यांची एकूण संपत्ती $1 दशलक्ष ते $2 दशलक्ष दरम्यान आहे. पवनदीप हा अवघ्या २५ व्या वर्षीच कोट्यावधी संपत्तीचा मालक बनला आहे.एवढेच नाही तर महिन्याला 10-20 लाख रुपये इतकं तो कमावतो.आलिशान आयुष्य आज पवनदीप राजन जगतो.पवनदीपकडे महिंद्रा XUV 500 सारखे लक्झरी गाड्यांचेही कलेक्शन आहे.